Liquor Policy Scam sakal
देश

Liquor Policy Scam : आव्हान याचिकेवर सोमवारी सुनावणी

सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) झालेल्या अटकेला आव्हान देणारे आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती.

सकाळ वृत्तसेवा

सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) झालेल्या अटकेला आव्हान देणारे आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ‘‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणे गरजेचे असल्यामुळे लवकर सुटका करावी,’’ अशी विनंती केजरीवाल यांनी याचिकेत केली आहे.

मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ‘ईडी’ने अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर या अटकेविरोधात केजरीवाल यांच्या वतीने मागील बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती केजरीवाल यांच्यावतीने करण्यात आली होती.

मात्र सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले होते. जर केजरीवाल यांची सुटका करण्यात आली नाही तर निवडणुकीच्या काळात विरोधी नेत्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्याची चुकीची परंपरा स्थापित होईल, असा तर्क केजरीवाल यांच्या वतीने ॲड.अभिषेक मनू सिंघवी यांनी दिला होता.

वजन वाढले

अरविंद केजरीवाल यांचे वजन एक किलोने वाढले असल्याची माहिती तिहार तुरुंग प्रशासनाने दिली आहे. एक एप्रिल रोजी केजरीवाल यांना तुरुंगात आणले गेले होते. त्यावेळी त्यांचे वजन ६५ किलो इतके होते. आता त्यांचे वजन ६६ किलो झाले असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे केजरीवाल यांच्याविरोधात तुरुंगात कट रचला जात असून त्यांचे वजन साडेचार किलोने कमी झाले असल्याचा आरोप ‘आप’ने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT