SBI  esakal
देश

SBI : निवडणूक रोख्यांप्रकरणी आज सुनावणी

बॅंकेविरोधात दाखल असलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना किती पैसा मिळाला, याची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) दिले होते. ही माहिती देण्यासाठी ३० जूनपर्यंतची वेळ देण्याबाबतच्या एसबीआयच्या याचिकेवर न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.

राजकीय पक्षांना निधी देण्याची निवडणूक रोख्यांची पद्धत घटनाबाह्य असल्याचा निकाल गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राजकीय पक्षांना रोख्यांद्वारे किती पैसा मिळाला, याची माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यावेळी न्यायालयाने एसबीआयला दिले होते. याप्रकरणी ३० जूनपर्यंतची मुदत दिली जावी, अशी विनंती करणारी याचिका एसबीआयकडून मागील आठवड्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान रोख्यांसंदर्भातील माहिती देण्यास स्टेट बँक जाणूनबुजून विलंब करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान यावेळी बॅंकेविरोधात दाखल असलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्टेट बँकेला १२ एप्रिल २०१९ पासून ते आतापर्यंत राजकीय पक्षांना प्राप्त झालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती द्यावयाची आहे. ही माहिती १३ मार्चपर्यंत संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही न्यायालयाने बँकेला दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT