Hemant Soren sakal
देश

Hemant Soren : हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्रिपदी;झारखंड सरकारची सूत्रे स्वीकारली,कुटुंबीयांचीही उपस्थिती

झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी आज पुन्हा राज्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनामध्ये झालेल्या सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सकाळ वृत्तसेवा

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी आज पुन्हा राज्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनामध्ये झालेल्या सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला हेमंत सोरेन यांचे पिता आणि पक्षाचे सर्वोच्च नेते शिबू सोरेन, त्यांची आई रूपी सोरेन, पत्नी कल्पना सोरेन आणि मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री चंपई सोरेन यांची उपस्थितीही यावेळी लक्षवेधी ठरली.

मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर २८ जून रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. तत्पूर्वी जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक होण्यापूर्वी सोरेन यांनी ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदाची सूत्रे चंपई सोरेन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. आता चंपई सोरेन यांच्याकडे पक्षातील अन्य जबाबदाऱ्या सोपविल्या जातील असे हेमंत सोरेन यांनी सांगितले.

विरोधकांचे कारस्थान यशस्वी

  • कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्देशून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात हेमंत सोरेन यांनी विरोधकांनी कारस्थान रचले होते असा आरोप केला.

  • ‘‘या कारस्थानामध्ये विरोधकांना यश आले त्यामुळेच पाच महिने तुरुंगात काढावे लागले. याविरोधात मी कायदेशीर लढाईचा मार्ग निवडला होता. तुम्ही मला रस्त्यांवर देखील पाठिंबा दिला. आज न्याय झाला असून माझी तुरुंगातून सुटका झाली आहे,’’ असे सोरेन म्हणाले.

  • झारखंडमधील चंपई सोरेन पर्व संपुष्टात आले असून झारखंड मुक्ती मोर्चामध्ये बाहेरच्या लोकांना कसल्याही प्रकारचे स्थान नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मावळते मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्याकडून प्रेरणा घेत भ्रष्ट हेमंत सोरेन यांच्याविरोधात उभे राहायला हवे होते.

- निशिकांत दुबे, भाजपचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT