bisexual_0.jpg 
देश

दोन पोलिस आणि तेही समलिंगी; घरच्यांकडूनच आहे हत्येची भीती

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

गांधीनगर- गुजरात उच्च न्यायालयाने समलिंगी पोलिस कर्मचारी दाम्पत्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांना (sp) लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. समलिंगी(लेसबियन) दाम्पत्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि समाजाकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. शिवाय त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. 

"माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल, पण खोटं बोलणार नाही"
24 वर्षीय समलिंगी दाम्पत्य महिसागर येथे राहतात. कुटुंबीयांना त्यांच्या संबंधाला मंजूरी नसल्याने त्यांनी या दाम्पत्याला धमकी देणे सुरु केले होते. समलिंगी दाम्पत्याने याप्रकरणी भावनगर आणि महीसागर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. शिवाय महीसागर जिल्हा पोलिस अधीक्षकांना जूनमध्ये याबाबत काही करण्याची विनंती केली होती. मात्र, याचा काही परिणाम होत नसल्याने दाम्पत्याने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती.

याचिकेमध्ये माहिती देण्यात आली आहे की, दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहतात आणि तेव्हापासून त्यांचे समलिंगी शारीरिक संबंध आहेत. त्यांचे संबंध समाज, कुटुंबीय आणि समुदायाला मान्य नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून त्यांना वारंवार धमक्या मिळत आहेत.

सचिन पायलट अडचणीत; राजस्थानच्या राजकीय नाट्यात दिवसभरात तीन मोठ्या घडामोडी
न्यायमूर्ती एजे देसाई यांनी 23 जून रोजी या प्रकरणी आदेश दिले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक, महीसागर यांनी याप्रकरणी लक्ष घालावे आणि तात्काळ पाऊलं उचलावीत. शिवाय गरज पडल्यास याचिकाकर्त्यांना पोलिस सरंक्षण पुरवले जावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 6 सप्टेंबर 2018 रोजी LGBTQ समुदायाप्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला होता. न्यायालयाने कलम 377 असंवैज्ञानिक ठरवले होते. त्यामुळे भारतात समलैंगिकता आता कायदेशीर ठरवण्यात आली आहे. मात्र, समाजाने अजून समलिंगी समुदायाला स्विकारल्याचं दिसत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

Tablet For Students: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट! मुख्यमंत्र्यांचा निर्णय, DBTद्वारे थेट खात्यात रक्कम

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

SCROLL FOR NEXT