हाय रिस्क 'ओमिक्रॉन' देऊ शकतो RT-PCR टेस्टलाही चकवा! जाणून घ्या सविस्तर esakal
देश

हाय रिस्क 'ओमिक्रॉन' देऊ शकतो RT-PCR टेस्टलाही चकवा!

हाय रिस्क 'ओमिक्रॉन' देऊ शकतो RT-PCR टेस्टलाही चकवा! जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचे नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट एक मोठा धोका मानला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याचे वर्णन हाय रिस्क व्हेरिएंट म्हणून केले आहे.

कोरोनाचे (Covid-19) नवीन ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट एक मोठा धोका मानला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील याचे वर्णन हाय रिस्क व्हेरिएंट (High Risk Variant) म्हणून केले आहे. प्राथमिक डेटा असे सूचित करतो, की नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट अधिक सांसर्गिक असू शकते आणि लसीचा या व्हेरिएंटवर कमी परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत जगभरातील देश कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरिएंटला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, या नवीन व्हेरिएंटबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे हा विषाणू जगात वापरली जात असलेल्या RT-PCR चाचणीद्वारे शोधली जाऊ शकते. मात्र, एका वृत्तसंस्थेशी बोलताना शास्त्रज्ञांनी सांगितले, की हे सोपे नाही. भारतातील बहुतेक RT-PCR चाचण्या ओमिक्रॉन आणि इतर प्रकारांमध्ये फरक करण्यास सक्षम नाहीत.

आरटी-पीसीआर चाचणी एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याची पुष्टी करू शकते; पण या चाचण्या अशा प्रकारे तयार केलेल्या नाहीत की कोणाला कोरोनाचा कोणता प्रकार आहे हे कळू शकेल. हे शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगचा अभ्यास करावा लागेल. सर्व संक्रमित नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात नाहीत, कारण ही एक संथ, क्‍लिष्ट आणि खर्चिक प्रक्रिया आहे. सामान्यतः सर्व पॉझिटिव्ह नमुन्यांपैकी फक्त एक लहान सबसेट - सुमारे 2 ते 5 टक्के - जनुके विश्‍लेषणासाठी पाठवले जातात.

इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्‍स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे शास्त्रज्ञ विनोद स्करिया यांनी सांगितले की, किटद्वारे व्हेरिएंट शोधणे किटमध्ये दिलेल्या रसायनांच्या प्रकारावर अवलंबून असते. तथापि, भारतात अशा प्रकारची फार कमी किट आहेत जी नवीन व्हेरिएंटबद्दल सांगू शकतात. अशा परिस्थितीत, वापरल्या जाणाऱ्या या विशेष किटमधून कोविडचे प्रकार ओळखले जातील, असे कोणीही म्हणू शकत नाही. प्रत्येक चाचणीसाठी जीनोम सिक्वेन्सिंग शक्‍य नसल्याने स्मार्ट स्ट्रॅटेजीवर काम करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT