Supriya Sule On PM Modi
Supriya Sule On PM Modi e sakal
देश

हिजाब प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात; म्हणाल्या, 'ही मोरल पॉलिसींग...'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कर्नाटकमधील हिजाबच्या वादावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य करताना भाजपची नैतिक फौजदारी आणि वैचारिक फौजदारी सुरू असल्याचा प्रहार आज लोकसभेत (Loksabha) केला. तसेच उद्योजक घराण्यांचे ५० वर्षातील योगदानाचा अनादर करू नका, असा खोचक सल्लाही सरकारला दिला. (Supriya Sule on Hijab Controversy)

सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दरम्यान कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून झालेल्या गदारोळाचा मुद्दा उपस्थित केला. कोणते कपडे हेच ठरविणार. काय खायचे, कुठे कधी जायचे हेच ठरविणार, काय बोलायचे काय नाही बोलायचे, काय शेअर करायचे काय फॉरवर्ड करायचे हेच ठरविणार. याला हुकूमशाही म्हणायचे तर आणीबाणीचा राग आमच्यावर काढणार. यांच्यावर टीका केली तर देशद्रोहाचा खटला टाकणार. लोकशाहीसाठी आंदोलन केले तर आम्हाला आंदोलनजीवी म्हणून हेटाळणार. लोकहो आता तुम्ही काय करणार? श्वास कोंडला असून संकट आपल्या दारात येऊन उभे आहे, अशा मराठी ओळी सादर करून सुप्रिया सुळे यांनी या घटनाक्रमावरील अस्वस्थता व्यक्त केली.

राजकीय घराणेशाहीवरून भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांना टोला लगावताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या राजकीय पार्श्वभूमीचा अभिमान व्यक्त करताना प्रीतम मुंडे, पूनम महाजन, हीना गावित रक्षा खडसे, सुजय विखे पाटील, केंद्रातील मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमीचाही उल्लेख करून सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. तर, विप्रो. सिप्ला, इन्फोसिस किर्लोस्कर अंबानी बजाज, वालचंद समूह, फिरोदिया, पुनावाला कल्याणी धूत अशा कंपन्यांचे मागील ५० वर्षात मोठे योगदान आहे. या उद्योजक घराण्यांनी शून्यातून संपत्तीचे आणि रोजगाराचे निर्माण केले हे विसरू नका आणि त्यांचा अनादर करू नका असा सल्ला देत मोदींच्या सत्तेआधीही देशात उद्योगविश्व विस्तारल्याचा दाखला देत भाजपला फटकारले. महाराष्ट्राची केंद्राकडे जीएसटी भरपाईची २८ हजारहून कोटीहून अधिक रकमेची थकबाकी असल्याचे सांगताना ही रक्कम कधी मिळणार अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : रिले रूसोचा धडाका; पंजाबने 180 धावांचा आकडा

SCROLL FOR NEXT