देश

Hijab Row : महिलांनी आपल्या हक्कासाठी उभं राहीलं पाहिजे; 'त्या' मुलीचं आवाहन

हिजाब घालून महाविद्यालयात येणाऱ्या मुस्कानला अडवल्याचा व्हिडिओ देशभारत व्हायरल होतोय.

सुधीर काकडे

हिजाबवरून सध्या देशातील राजकारण तापलं आहे. कर्नाटकातील (karnataka) मंड्या (Mandya) येथील महाविद्यालयातील याच प्रकरणातील एक व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला आहे. हिजाब (Hijab Row) घालून महाविद्यालयाच्या आवारात आलेल्या विद्यार्थीनीचा काही कट्टरतावादी विद्यार्थ्यांनी घोषणा देत विरोध केला. मात्र या विद्यार्थीनीनेही न घाबरता त्यांना उत्तर दिलं आणि ती महाविद्यालयात गेली. हा व्हिडिओ सध्या देशभरात व्हायरल होत असून, अनेकांनी या मुलीचं कौतुक केलं आहे. त्यानंतर आता या विद्यार्थीनीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

बीकॉमचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला मंगळवारी तरुणांच्या गटानं बुरखा, हिजाब घातल्यामुळे विरोध केला होता. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीवरून राज्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरच ही घटना घडली असून, याचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसत आहेत. "मी मोठ्या हिमतीने परिस्थितीचा सामना केला, सर्व मुलींनी असंच कणखर व्हावं आणि त्यांचे हक्क मिळण्यासाठी झगडावं असं मला वाटतं" असं मत कॉमर्सचं शिक्षण घेणाऱ्या मुस्कान खानने व्यक्त केलं आहे.

देशात कोणत्याही धर्माचं पालन करण्याचं लोकांना स्वातंत्र्य आहे असं मुस्कान म्हणाली. पुढे बोलताना ती म्हणाली की, ते त्यांच्या संस्कृतीचं अनुसरण करतात, मी माझ्या संस्कृतीचं अनुसरण करते. मला माझ्या संस्कृतीचं अनुसरण करण्याची परवानगी दिली पाहिजे. मी कुणावरही आक्षेप घेत नाही, मग त्यांनीही माझ्यावर आक्षेप घेऊ नये. बुरखा आणि हिजाब घालणे हा माझा अधिकार आहे".

दरम्यान, या व्हिडिओनंतर मुस्कानचं कौतुक करताना, एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, तिची "ज्या पद्धतीनं ती न घाबरता या प्रसंगाला सामोरं गेली, त्यामुळे ती सर्वांसाठीच आदर्श बनली आहे. आपण मुस्कान आणि तिच्या कुटुंबीयांशी फोनवर बोललो असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मंड्याचे एसपी यतीश म्हणाले की, जर त्यांनी संरक्षण मागितलं तर पोलीस मुस्कानला आणि तिच्या कुटुंबियांना सुरक्षा देखील पुरवण्यास तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT