Karnataka Hijab Controversy esakal
देश

कर्नाटक : हिजाब प्रकरणावर उद्या सुनावणी; आज काय घडलं जाणून घ्या

हिजाब प्रकरणावर विविध याचिकाकर्त्य्यांच्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. युक्तीवादादरम्यान काही महत्वाच्या बाबींवर कोर्टानं टिप्पणी केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कर्नाटक : शाळांमध्ये मुस्लीम मुलींनी हिजाब परिधान करण्यावरुन सध्या कर्नाटकात चांगलाच वाद पेटला आहे. हे प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचलं असून दोन दिवसांपासून यावर सुनावणी सुरु आहे. उद्याही यावर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी आजच्या सुनावणीत काय मुद्दे कोर्टासमोर आले ते आपण पाहणार आहोत. (Hijab row Karnataka High Court adjourns the hearing for tomorrow)

हिजाब प्रकरणावर कर्नाटक हायकोर्टात आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर एकामागून एक मुद्दे युक्तीवादादरम्यान पुढे येत गेले. अॅड. आदित्य चॅटर्जी यांनी कर्नाटक राज्य शासनाच्या हिजाबबंदीच्या आदेशाविरोधीत एका याचिकाकर्त्याच्यावतीनं बाजू मांडली. तर आणखी दोन याचिकांमध्ये कारवाईचं कारण दाखवलेलं नाही, याचिकाकर्ते खाजगी संस्थांचे आहेत. त्यांनी फक्त सरकारच्या आदेशावर प्रश्न उपस्थित केला आहे," असं अॅटर्नी जनरल यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, दुसऱ्या एका याचिकाकर्त्याच्या वकिलांनी खंडपीठाकडं विनंती केली की, युक्तीवादासाठी वेळमर्यादा निश्चित करावी. तर आणखी एका याचिकाकर्त्याचे वकिल रहमतुल्ला कोतवाल यांनी मानवाधिकाराच्या वैश्विक जाहिरनाम्याचा उल्लेख करत प्रत्येकाला धर्माचं आणि विचारांचं स्वातंत्र्य असल्याचं म्हटलं. तसेच खंडपीठानं एका सामाजिक कार्यकर्त्याची याचिका फेटाळून लावली. नियमांनुसार ही जनहित याचिका दाखल केलेली नाही, त्यामुळं संबंधित याचिकाकर्त्यानं कोर्टाचा वेळ वाया घालवला असं सांगत खंडपीठानं याचिकाकर्त्याला शिक्षा सुनावणार असल्याचं म्हटलं.

यावेळी आणखी एक याचिकाकर्ते विनोद कुलकर्णी यांनी खंडपीठाला विनंती केली की, खंडपीठानं मुस्लीम मुलींना किमान शुक्रवारच्या दिवशी तरी हिजाब वापरण्याची परवानगी द्यावी, कारण शुक्रवारी जुम्माचा दिवस असतो. पण हिजाबबंदी कायम ठेवल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याचिकाकर्त्याच्या या मुद्द्यावर कोर्टानं प्रतिसाद देत याची दखल घेतली जाईल असं म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT