Anup Kesari
Anup Kesari Sakal
देश

FIR कुठे आहे?; महिलेशी गैरवर्तनाच्या आरोपानंतर केसरींचा 'आप'ला सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हिमाचलप्रदेशमध्ये सध्या आम आदमी पक्षाला गळती लागली असून आपच्या प्रदेशाध्याक्षानंतर आता महिला मोर्चा अध्यक्ष ममता ठाकूर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. काल त्यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत काही नेत्यांबरोबर प्रवेश केला. त्याअगोदर आपचे हिमाचलमधील प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी यांनीही संगठन महामंत्री सतीश ठाकूर यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान एका आठवड्यांपूर्वी आपचे अध्यक्ष केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत माण यांनी हिमाचलमध्ये रोड शो करत शक्तीप्रदर्शन केलं. त्यादरम्यान आपचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपात गेलेल्या अनुप केसरी यांनी महिलेसोबतच्या केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना पक्षातून काढलं असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर केसरी यांनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

अनुप केसरी यांनी त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करत माझ्यावर झालेल्या आरोपामुळे कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं. जर तुम्ही माझ्यावर आरोप करत असाल तर माझ्याविरोधात दाखल केलेली तक्रार मला दाखवा. काय पुरावे आहेत? FIR कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले मी या पक्षाच्या वाढीसाठी कामं केलं आणि मी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा मला हे अशी वागणूक देत आहेत. असं त्यांनी Indian Express शी बोलताना सांगितलं.

दरम्यान पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री माण आणि केजरीवाल यांनी हिमाचलमध्ये तिरंगा यात्रा काढल्यानंतर लगेच केसरी यांनी भाजपात प्रवेश केला होता. जे पक्षांसाठी झोकून देऊन काम करतात त्यांना पक्षाकडून दुर्लक्षित केलं जात असं ते म्हणाले. तिरंगा यात्रा होईपर्यंत सगळे काही ठीक होते पण जेव्हा जेव्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा 'आप'ला झटका लागला आणि असे आरोप सुरु झाले अशी टीका भाजपाचे नेते सुरेश कश्यप यांनी केली. दरम्यान माझ्यावर चिखलफेक झाल्याने आपण कोर्टात जाणार असल्याचं केसरी यांनी बोलताना सांगितलं.

दरम्यान केसरी यांनी २०१३ ते १४ च्या दरम्यान एक कार्यकर्ता म्हणून आपमध्ये प्रवेश केला होता. पक्षासाठी काम करत करत ते प्रदेशाध्याक्ष पदापर्यत पोहोचले होते. २० डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी आपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT