Covid Vaccine esakal
देश

सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्याने मिळवला पहिला मान

विनायक होगाडे

नवी दिल्ली : गेल्या १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाच्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या ८ महिन्यांमध्ये देशात आतापर्यंत 62 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या शुक्रवारी दिली आहे. देशात आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे. दरम्यान, भारतातील एका राज्याने लसीकरणासाठी पात्र असलेल्या 100 टक्के लोकसंख्येला पहिला डोस देण्याचा पहिला मान मिळवला आहे.

हिमाचल प्रदेश हे राज्य देशातील पहिलं असं राज्य ठरलं आहे, ज्याने आपल्या लसीकरणासाठी पात्र असलेल्या संपूर्ण लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस दिला आहे. याबाबतची माहिती हिमाचल प्रदेशचे आरोग्यमंत्री राजीव सैझल यांनी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, हिमाचल प्रदेशमध्ये 100 टक्के पात्र वयस्कर लोकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. राज्याच्या लसीकरण कार्यक्रमातील कामगिरी अत्यंत उत्तम आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण वयस्कर लोकसंख्येला लशीचा दुसरा डोस देखील देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

देशात गेल्या शुक्रवारी एका दिवसांत तब्बल एक कोटी डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलंय की, आज लसीकरणात विक्रम नोंदवला गेला आहे! 1 कोटी ओलांडणे हा एक महत्त्वाचा पराक्रम आहे. तसेच त्यांनी लस घेतलेल्यांचे आणि लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्यांचे अभिनंदन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT