Himachal Pradesh Floods 
देश

Himachal Pradesh Floods: हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच... आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू, 16 बेपत्ता

हिमाचल प्रदेशात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Sandip Kapde

Himachal Pradesh floods : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला आहे. भूस्खलन, वीजपुरवठा खंडित, अडवलेले रस्ते आणि खराब झालेले पूल यामुळे राज्यभर विनाश दिसत आहे. राज्याच्या विविध भागात अजूनही अनेक पर्यटक अडकून पडले असताना मृतांची संख्या 88 वर पोहोचली आहे. नुकसानीचा अंदाजित खर्च 3,000 कोटी ते 4,000 कोटी रुपयांच्या दरम्यान नोंदवला गेला आहे.

ताज्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे 88 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 16 बेपत्ता आणि 100 जखमी झाले आहेत. राज्यभरात ४९२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

चंदीगड-मनाली आणि शिमला-कालका महामार्गांसह भूस्खलनामुळे 1,300 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. मनाली ते मंडी ही एकेरी वाहतूक काल रात्री उघडण्यात आली आणि रात्रभर 1,000 हून अधिक अडकलेली पर्यटक वाहने या मार्गावरून गेली.

राज्याच्या आपत्ती विभागाने सांगितले की पावसामुळे 40 पुलांचे नुकसान झाले आहे, तर राज्यभरातील शाळा 15 जुलैपर्यंत बंद घोषित करण्यात आल्या आहेत. बाधित भागातील 20,000 हून अधिक लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. (latest marathi news)

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, परिस्थितीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे, परंतु अद्याप बरेच काम करणे बाकी आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या पावसाने संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर नासधूस केली, अनेक मृत्यू, भूस्खलन आणि मालमत्तेचे नुकसान झाले. यामध्ये हिमाचल प्रदेश सर्वाधिक प्रभावित राज्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT