hindus should give birth to 4 children controversial statement of sadhvi ritambhar Kanpur  sakal
देश

हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा : साध्वी ऋतंभरा

हिंदू कुटुंबाने चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील दोन मुले ही देशाला अर्पण करावीत त्यामुळे भारत हा हिंदू राष्ट्र बनेल

सकाळ वृत्तसेवा

कानपूर- लखनौ : वाद्ग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्या साध्वी ऋतंभरा यांनी हिंदू कुटुंबाने चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील दोन मुले ही देशाला अर्पण करावीत त्यामुळे भारत हा हिंदू राष्ट्र बनेल असे म्हटले आहे. दिल्लीत जहाँगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या की, ज्यांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला केला त्या मंडळींचा देशाची प्रगती पाहून जळफळाट होतो आहे . राजकीय दहशतवादाच्या माध्यमातून हिंदू समाजाचे विभाजन करू पाहणारी मंडळी धुळीला मिळतील असेही त्यांनी म्हटले आहे. त्या येथे राम महोत्सवामध्ये बोलत होत्या.

ऋतंभरा म्हणाल्या की, सध्या हिंदू भगिनी या ‘हम दो, हमारे दो’ या तत्त्वाचे पालन करत असतात पण मी त्यांना विनंती करते की त्यांनी चार मुलांना जन्म द्यावा त्यातील दोन मुले ही देशाला अर्पण करण्यात यावीत आणि उर्वरित दोन मुले स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवावीत असे केले तरच भारत लवकर हिंदूराष्ट्र होईल. देशामध्ये तातडीने समान नागरी कायदा लागू करण्यात यावा तसे केले तर लोकसंख्येमध्ये असमतोल तयार होणार नाही. देशाच्या लोकसंख्येमध्ये असमतोल असेल तर राष्ट्राचे भवितव्य देखील चांगले राहणार नाही. पालकांनी त्यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि दुसरा विश्व हिंदू परिषदेला अर्पण करावा, असेच आपले त्यांना सांगणे आहे.’’ राम मंदिर आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या ऋतुंभरा या विश्व हिंदू परिषदेच्या ‘दुर्गा वाहिनी’च्या संस्थापिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

SCROLL FOR NEXT