

Jasprit Bumrah | Mumbai Indians
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला सुरू होण्यासाठी आता केवळ ५ दिवसांचा कालावधी राहिला आहे. २८ मार्चपासून बंगळुरूमध्ये आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे.
पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाणार आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बाबतात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (BCCI CoE) येथे दाखल झाला आहे.