माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Husband Attacks Wife in Pimpalner : मळगाव येथील गोरख महाले याचा विवाह पिंपळनेरमधील २५ वर्षीय यशोदा हिच्याशी झाला होता. मात्र, काही काळापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता.
Dhule Crime News

Dhule Crime News

esakal

Updated on

भरत बागुल, पिंपळनेर (धुळे)

धुळे : जिल्ह्यातील पिंपळनेर येथे घरगुती वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी पती फरार झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मळगाव येथील गोरख महाले याचा विवाह पिंपळनेरमधील २५ वर्षीय यशोदा हिच्याशी झाला होता. मात्र, काही काळापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे यशोदा आपल्या माहेरी राहत होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गोरख महाले हा तिच्या घरी पोहोचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com