Home Ministry sets up panel to coordinate probe into 3 Gandhi family trusts 
देश

गांधी कुटुंबाला मोठा झटका; तपासासाठी सरकारनं नेमली समिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गांधी कुटुंबाला एक मोठा झटका बसला असून राजीव गांधी फाउंडेशननं परदेशातून देणग्या घेताना कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा केंद्र सरकार तपास करणार असून केंद्र सरकारनं प्रकरणाच्या चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे. ईडीचे संचालक या समितीचे प्रमुख असणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणाची होणार चौकशी?
परदेशातून स्वीकारण्यात आलेल्या देणग्यासंदर्भात केंद्र सरकार राजीव गांधी फाउंडेशनबरोबरच गांधी कुटुंबाचा संबंध असणाऱ्या इतर दोन फाउंडेशनची चौकशी करणार आहे. यात राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?
राजीव गांधी फाउंडेशननं परदेशातून विशेषतः चीनकडून देणग्या घेताना पीएमएलए, आयकर कायदा, एफसीआरए या कायद्यातील विविध नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ही माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारनं तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचा आरोप
एका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर चीनकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून मिळालेल्या देणगीवरून हा आरोप करण्यात आला होता. २००५-०६मधील राजीव गांधी फाउंडेशनला डोनेशन देणाऱ्यांची यादी आहे. यात चीनच्या दूतावासानेही डोनेशन दिलं आहे. हे स्पष्टपणे दिलं आहे. हे असं का झालं. याची काय गरज पडली? यात अनेक उद्योगपतींचीही नावं आहेत. चीनच्या दूतावासाकडून लाच घेतली हे पुरेसं नव्हतं का? काँग्रेसनं याचं उत्तर द्यावं की चीनसोबत इतकं प्रेम का आहे? देशाला जाणून घ्यायचं आहे की, राजीव गांधी फाउंडेशनला इतका पैसा कोणत्या गोष्टीसाठी देण्यात आला आणि त्यांनी देशात कोणता अभ्यास केला. लोकांना आपल्या बाजूनं करण्यासाठी अनेक युक्त्या असतात आणि आज चीनविरोधात असे उभे आहेत, जसं की यांच्या बरोबरीचं कुणीच नाही, असा आरोप नड्डा यांनी काँग्रेसवर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT