H3N2 Virus esakal
देश

H3N2 Virus : कोरोनानंतर भारतावर आता 'या' विषाणूचं संकट; हरियाणा, कर्नाटकात घेतला बळी

देशात आतापर्यंत H3N2 विषाणूचे 90 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, H1N1 विषाणूचे 8 रुग्ण आढळले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बदलत्या हवामानामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बळी पडत आहेत. यातील अनेकांना H3N2 विषाणूची लागण झाल्याचाही संशय आहे.

कोरोनानंतर (Coronavirus) आता गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेला H3N2 विषाणू (H3N2 Virus) आता जीवघेणा ठरत आहे.

या विषाणूची लागण होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, यापैकी एक केस हरियाणातील आहे, तर दुसरी केस दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील आहे. या विषाणूच्या संसर्गामध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणं आणि डोळ्यात जळजळ होणं अशी लक्षणं आढळतात.

एवढंच नाही तर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याचा इतर लोकांवरही परिणाम होऊ शकतो. कर्नाटकातील हसन जिल्ह्यात या विषाणूमुळं एका 82 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्चला वृद्धाचा मृत्यू झाला. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वृद्धाला ताप, घसादुखी, अंगदुखी अशा समस्या होत्या. आजारपणामुळं त्यांना 24 फेब्रुवारीला हसन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्यांचं 1 मार्चला निधन झालं.

H3N2 विषाणूमुळं वृद्ध व्यक्तीचा मृत्यू 6 मार्चला झाला होता. वृद्धाच्या संपर्कात कोण आलं हे पाहण्यासाठी सध्या प्रशासनाकडून पाळत ठेवण्यात येत असल्याचं हसनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत H3N2 विषाणूचे 90 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, H1N1 विषाणूचे 8 रुग्ण आढळले आहेत. बदलत्या हवामानामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बळी पडत आहेत. यातील अनेकांना H3N2 विषाणूची लागण झाल्याचाही संशय आहे. या विषाणूला हाँगकाँग फ्लू असंही म्हणतात. याची लागण झालेल्या लोकांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता यासारखी लक्षणं आढळतात. इतकंच नाही तर घसा खवखवणं, थकवा येणं, अंगदुखी, जुलाब अशा समस्याही आढळून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

SCROLL FOR NEXT