Ghosh Dastidar Family esakal
देश

प्रेम असावं तर असं! कुत्र्याच्या मृत्यूनंतर घोष कुटुंबानं घातलं श्राध्द

सकाळ डिजिटल टीम

वन्य प्राण्यांबद्दलचं प्रेम दाखवण्यासाठी पाळीव प्राणी प्रेमी अनेक मार्ग अवलंबतात; पण..

हुगळी : कुत्र्यांवर प्रेम करणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. या वन्य प्राण्यांबद्दलचं प्रेम दाखवण्यासाठी पाळीव प्राणी प्रेमी अनेक मार्ग अवलंबतात. पण, पश्चिम बंगालच्या (West Bengal) हुगळीत राहणारे घोष दस्तीदार कुटुंब (Ghosh Dastidar Family) यापेक्षा वेगळं आहे. दस्तीदार कुटुंब आपल्या पाळीव कुत्र्याला कुटुंबाचा सदस्य मानतात. मात्र, त्यांच्या एका कुत्र्याचा नुकताच मृत्यू झालाय, त्यामुळं या कुटुंबानं त्याचं श्राद्ध घातलंय. आता त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त रस्त्यावर राहणाऱ्या 100 हून अधिक भटक्या कुत्र्यांना त्यांनी मांसाहराचं जेवण घातलं.

तरुण घोष दस्तीदार यांचं कुटुंब हुगळीच्या चंदन नगर भागात राहतं. इथं त्यांचे अनेक पाळीव कुत्रे (Dogs) होते. त्यापैकी एकाचं नाव त्यांनी 'विंचू' असं ठेवलं होतं. घरातील सर्वांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. कुटुंबानं त्या कुत्र्याला आपल्या मुलाप्रमाणं वाढवलं. मात्र, गेल्या वर्षी विंचू या कुत्र्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून त्याचं श्राद्ध घातलं. या कुटुंबानं दरवर्षी 'विंचू'चा पुण्यतिथी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.

या उद्देशानं रविवारी त्यांनी आपलं घर फुलांच्या माळांनी सजवलं. 'विंचू' या कुत्र्याचा फोटो समोर ठेवून पुष्पहार घालून त्याची पूजा केली. त्यानंतर रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांसाठी मांस आणि भाताचा बेत केला. कुटुंबानं व्हॅनमधून जेवण आणून रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना खाऊ घातलं. घोष दस्तीदार हे स्वतः शाकाहारी आहेत, परंतु त्यांनी कुत्र्यांसाठी मांस आणि भात बनवला, कारण त्यांना तो आवडतो. दस्तीदार कुटुंबानं पहिल्यांदाच कुत्र्यांसाठी अन्न तयार करून वाटप केलं असं नाही. यापूर्वी देखील या कुटुंबांना कुत्र्यांसाठी अनेकदा अन्न खाऊ घातलंय. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT