Fir at Kanpur 
देश

Fire at Hut: अधिकाऱ्यांच्या समोर मायलेकींचा होरपळून मृत्यू; भीषण घटनेनं कानपूर हादरलं

पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कानपूर : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्यासमोरच मायलेकीचा होरपळून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भीषण घटनेमुळं कानपूर हादरलं आहे. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यासमोरचं हा प्रकार घटल्यानं यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Horrible Fire at Hut Incident at Kanpur Mother and daughter death in front of authorities and Police)

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील मैथा तालुक्यातील मडौली गावात हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी ग्राम समाजाच्या जागेवर काही लोकांनी झोपड्या टाकून अतिक्रमण केलं होतं. हे अतिक्रमण हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात अधिकारी पोहोचले होते. यावेळीच एका झोपडीमध्ये एका महिलेचा आपल्या मुलीसह जळून मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. हे सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरचं घडल्यानं हे प्रकरण प्रशासनाच्या चांगलचं अंगलट येण्याची शक्यता आहे. या घटनेमध्ये या दोघींना वाचवायला गेलेल्या एक पोलीस अधिकारी देखील आगीमध्ये होरपळला.

दरम्यान, या जळीत घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी लेखपालाला कु्ऱ्हाडीनं वार करुन जखमी केलं आणि अधिकाऱ्यांच्या टीमला खूप पळवून लावण्यात आलं. यानंतर या लोकांनी एसडीएम, इन्स्पेक्टर, तहसीलदार आणि लेखपाल यांच्यासह गावाच्या १० लोकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह जागेवरुन उचलणार नाही, असा पवित्रा या ग्रामस्थांनी केला.

काय आहे घटना?

सोमवारी झालेल्या एका सुनावणीत जिल्हादंडाधिकारी नेहा जैन यांनी मडौली गावातील काही लोकांनी ग्राम समाजाच्या जागेवर गावातील कृष्ण गोपाल दीक्षित ऊर्फ राघव यांनी कब्जा केल्याची तक्रार दाखल केली होती. यावरुन जिल्हादंडाधिकाऱ्यांनी एसडीएम यांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजता एसडीएम मैथा प्रसाद, लेखपाल अशोक, इन्स्पेक्टर घटनास्थळी पोहोचले. अतिक्रमण विभागानं बुलडोझरनं हे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. त्यावेळी अचानक कृष्ण गोपाल यांच्या झोपडीला आग लागली. यामध्ये त्याची पत्नी प्रमिला (वय ५४) आणि मुलगी शिवा (वय २२) या दोघी अडकल्या आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT