Rain
Rain Sakal
देश

Heavy Rain: मुसळधार पावसामुळं राहतं घरं कोसळलं! तीन अंध भावांचा मृत्यू

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळं राहतं घर कोसळून त्यात तीन अंध भावांचा मृत्यू झाल्याची घटना जम्मू आणि काश्मीरमध्ये घडली आहे. तसेच त्यांचे इतर दोन कुटुंबीय देखील यामध्ये जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. (house collapsed due to heavy rain in Jammu and Kashmir Death of three blind brothers)

पोलिसांच्या माहितीनुसार, साजन कुमार (वय २८), राजेश कुमार (वय ३०) आणि रविंदर कुमार (वय ३२) असं मृत्यू झालेल्या तीन्ही मुलांची नावं आहेत. दोन दिवसांपूर्वी या भागातील अश्वनी कुमार नामक व्यक्तीचं घर मुसळधार पावसामुळं जमीनदोस्त झालं. यामध्ये त्यांच्या तीन अंध मुलांचा मृत्यू झाला. पण त्यांची पत्नी आणि मुलगी हे दुसऱ्या खोलीत झोपलेले असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं पण यामध्ये ते जखमी झाले आहेत.

नागसेनी तालुक्यात शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या कुटुंबातील पाच जण घरातील दोन खोल्यांमध्ये झोपलेले असताना ही दुर्घटना घडली. या कुटुंबाचं घर माती आणि कुडापासून बनवलेलं होतं. जोरदार पावसामुळं ते पूर्णपणे कोसळलं. हे ठिकाण किश्तवार इथून ३५ किमी अंतरावर आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दुर्घटना घडलेलं ठिकाण मुख्य शहरापासून दूर आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनं आणि जिल्हा प्रशासनं घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. बुधवारी किश्तवार जिल्ह्यात नोमॅडीक बकरवाल कुटुंबातील चार जणांचा पावसामुळं अंगावर झाड पडून मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT