Karnataka High Court esakal
देश

Privacy Violation : पत्नीच्या प्रियकराचं लोकेशन शोधण्यापूर्वी....कोर्ट काय म्हणालंय एकदा वाचाच

कर्नाटक हायकोर्टानं याबाबत महत्वाची टिप्पणी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Karnataka High Court : पतीला पत्नीच्या बॉयफ्रेन्डच्या लोकेशनची मागणी करता येणार नाही, असं कर्नाटक हायकोर्टानं म्हटलं आहे. हा प्रकार गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.

ही याचिका कथित बॉयफ्रेन्डच्यावतीनं हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. जी दाखल करुन घेत कोर्टानं सुनावणी दरम्यान ही महत्वाची टिप्पणी केली आहे. (Husband Cannot Seek Mobile Tower Location Of Wife Lover To Prove Adultery says Karnataka HC)

तिसऱ्या पक्षानं केली होती याचिका

एका दाम्पत्याच्या वैवाहिक प्रकरणात तिसऱ्या पक्षाची याचिका स्विकारत कर्नाटक हायकोर्टाचे न्या. एम. नागप्रसन्न यांनी आपला निर्णय देताना म्हटलं की, पतीच्या मागणीनुसार याचिकाकर्ता आणि आपल्या पत्नीमधील अवैध संबंध सिद्ध करु इच्छितो. पण त्यांना याचिकाकर्त्याच्या गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. या दाम्पत्यामधअये सन २०१८ मध्ये बंगळुरुच्या कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण सुरु होतं.

कौटुंबिक न्यायालयानं दिला होता आदेश

कौटुंबिक न्यायालयां २८ फेब्रुवारी २०१९ रोजी इतर व्यक्तीचं मोबाईल टॉवरचं रेकॉर्ड मागवून घेण्यास परवानगी दिली होती. जो मुद्दा कौटुंबिक प्रकरणांचा हिस्सा नव्हता. पतीनं आरोप केला होता की, हा तिसरा पक्ष त्याच्या पत्नीचा बॉयफ्रेन्ड आहे. ही बाब या बॉयफ्रेन्डच्या मोबाईल टॉवर आणि त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या डिटेल्सच्या माध्यमातून सिद्ध करु इच्छितो. या तिसऱ्या पक्षाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. ज्यानं २०१९ मध्ये कौटुंबिक कोर्टाच्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिली आहे. हायकोर्टानं ३० नोव्हेंबर २०२२ रोजी याचिका फेटाळण्यात आली.

गोपनियतेच्या निर्णयाचं उल्लंघन

याचिकेचा स्विकार करत हायकोर्टानं म्हटलं की, कोणत्याही नागरिकाला स्वतःची, आपलं कुटुंब, विवाह आणि इतर संबंधांची गोपनियतेचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. सूचनात्मक गोपनियता देखील गोपनियतेच्या अधिकाराचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळं याचिकाकर्त्याच्या मोबाईल टॉवरचे डिटेल्स कोर्टात सादर करणं हे निश्चितच सूचनात्मक गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT