Fatehabad Haryana
Fatehabad Haryana esakal
देश

पत्नीनं पाठवली घटस्फोटाची नोटीस, पतीनं गळफास लावून केली आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

नागेश्वरचं लग्न झाल्यापासून पत्नीसोबत सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं वाद व्हायचा.

हरियाणातील फतेहाबाद (Fatehabad Haryana) येथे एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केलीय. पोलिसांनी (Police) मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय. लग्न झाल्यापासून पती-पत्नीमध्ये मतभेद असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं पत्नी तिच्या माहेरच्या घरी गेली आणि घटस्फोटाची नोटीस पाठवली. दरम्यान, मन दुखावल्यामुळं या व्यक्तीनं गळफास लावून घेतला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या वडिलांनी सासरा, भावजयांसह 6 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

हे प्रकरण फतेहाबादच्या धांगड गावातील आहे. नागेश्वरचं (३०) लग्न झाल्यापासून पत्नीसोबत सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं वाद व्हायचा. अनेकवेळा हे प्रकरण पंचायतीतही गेलं. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळं नागेश्वरला काळजी वाटू लागली. नागेश्वर गुरुवारी रात्री घरात झोपला होता आणि रात्री खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. मृत नागेश्वरच्या खिशातून पोलिसांना सुसाईड नोट सापडलीय. ज्यात त्यानं आपल्या मृत्यूसाठी सासरा जगदीश, मेव्हणा कुलदीप यांच्यासह सहा जणांना जबाबदार धरलंय.

याप्रकरणी डीएसपी अजय सिंह (DSP Ajay Singh) यांनी सांगितलं की, धांगड गावातील नागेश्वरनं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय. मृत नागेश्वरचे वडील हनुमान सिंह यांनी आपल्या मुलाचा सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याची फिर्याद दिलीय. त्यामुळं आरोपी सासरा, मेहुणा आणि इतर सहा जणांविरुद्ध ३०६ आणि ३४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT