crime esakal
देश

Crime news : पतीनेच केले स्वतःच्या पत्नीचे अपहरण! मित्रांसमवेत बलात्कार करून अशी केली हत्या...

महिला मदतीसाठी आरडाओरडा करत होती, मात्र तिचा पती तिला मारहाण करत होता.

सकाळ वृत्तसेवा

गुजरात मधील दाहोदमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पतीनेच त्याच्या पत्नीचे अपहरण करून मित्रांसमवेत तिचा बलात्कार केला व तिला मारहाण करत तिची हत्या केली. या घटणेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर या प्रकरणी दखल घेउन आरोपीला अटक केले, व पुढील चौकशी सुरू केली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला तिच्या पतीपासून वेगळी होऊन मेहसाणाच्या चान्समा येथे एका पुरुषासोबत राहत होती. या महिलेला चार मुले असून ते तिच्या पती सोबतच राहत आहे. ही महिला 28 मे रोजी एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली. तेथे तिचा पती त्याच्या तीन मित्रांन समवेत आला होता.

पहिले त्याने महिलेला भेटण्यासाठी बोलवले, तिने भेटण्यासाठी नकार दिल्यानंतर त्याने तिचे अपहरण केले व तिला एका वाहनात मारगाळा गावात आणून तिच्यावरती तिघांनी बलात्कार केला. महिला मदतीसाठी आरडाओरडा करत होती, मात्र तिचा पती तिला मारहाण करत होता. दरम्यान, कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला, त्याची दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाची पतीसह तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावतीमधील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT