file photo
file photo 
देश

ब्राह्मण म्हणून नवरा केला अन् निघाला...

वृत्तसंस्था

अहमदाबाद (गुजरात): विवाहापूर्वी पतीने आपली जात ब्राह्मण असल्याचे सांगत त्याची खरी जात लपवून विवाह केल्यानंतर पत्नीने सहा महिन्यांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुजरातमधील मेहसाणामध्ये ही घडली आहे.

पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या युवतीचे नाव एकता पटेल (वय 23) आहे. एकताचा यश नावाच्या व्यक्तीबरोबर 23 एप्रिल रोजी विवाह झाला आहे. यशने त्याचे आडनाव मेहता असून, तो ब्राह्मण समाजातील असल्याचे सांगितले होते. विवाहाची नोंदणी केल्यानंतर नवऱ्याचे आडनाव मेहता नसून, खामर आहे व तो ब्राह्मण समाजातील नसल्याचे तिला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकताने गेल्या वर्षी एमकॉम पूर्ण केले होते. पदवी घेतल्यानंतर व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ती एका गॅस एजन्सीमध्ये नोकरी करू लागली. त्या गॅस एजन्सीच्या मालकाचे नाव ज्योत्सना मेहता असल्याचे समजले. पुढे ज्योत्सना यांचा मुलगा यश बरोबर तिची ओळख झाली व ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

दोघांचा 23 एप्रिल रोजी विवाह पार पडला. दोघांनी मेहसाणा न्यायालयात जाऊन विवाहाची नोंदणी केली. विवाहानंतर शेजारच्यांनी काही दिवसांत तिला तिच्या नवऱ्याचे आडनाव खमार असल्याचे सांगितले. शिवाय, तो ब्राह्मण नसून कछिया जातीचा असल्याची माहिती दिली. या माहितीची खातजमा केल्यानंतर एकता चिडली. तिने आई-वडिलांना माहिती देऊन यश मेहता उर्फ खमार विरोधात पोलिसांकडे फसवणूकीची तक्रार दाखल केली. 'याप्रकरणामुळे मी प्रचंड दुखावले आहे' अशी प्रतिक्रियाही एकताने व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT