rape
rape Sakal
देश

हैद्राबाद बलात्कार: दोन अल्पवयीनांसह बड्या नेत्याच्या मुलाला अटक

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : हैदराबाद सामूहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरणात शनिवारी आणखी दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली असून त्यात टीआरएस नेत्याच्या (TRS Leader) अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याआधी शुक्रवारी या प्रकरणातील पाच आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. घटनेतील पाच आरोपींपैकी तीन अल्पवयीन असून, फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (Hyderabad Gang Rape)

दरम्यान, या घटनेत टीआरएस नेत्याच्या मुलाला अटकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलाने ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी हैद्राबादमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने आपल्याला मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे. तसेच आरोपींच पक्षाशी किंवा दर्जा काहीही असो त्यांच्यावर कठोरातील कठोर कारावाई करण्यात यावी, असे म्हटले आहे.

शहरातील या घटनेत सहभागी असणाऱ्या पाचही आरोपींची ओळख पटली असून, घटनेपूर्वी काही तासांपूर्वी पीडित मुलगी आणि आरोपींचे पबमधून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये पीडित मुलगी आरोपींसह पबमधून बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे, असे घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले आहे. घटनेदरम्यान, आरोपींनी ज्युबली हिल्स परिसरात कार उभी केली आणि पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. तर, काही जण कारच्या बाहेर पहारा देत होते. घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या संपूर्ण घटनेत पोलिसांकडून पब चालकाचीदेखील कसून चौकशी केली जात असून, अल्पवयीन मुलांना या ठिकाणी कोणत्या आधारे प्रवेश देण्यात आला, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेनंतप पब व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून, पार्टीमध्ये कोणत्याही व्यक्तीला मद्यपान किंवा धूम्रपान करण्यास मनाई असल्याचे म्हटले असून, ईशान नावाच्या व्यक्तीने पार्टीसाठी जागा बुक केली होती. तसेच पार्टीनंतर सर्वजण एका कारमधून निघून गेल्याचे पब व्यवस्थापनाकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT