Chief Justice N V Ramana esakal
देश

मी राजकारणात येण्यास उत्सुक होतो, पण नियतीनं मला..; सरन्यायाधीशांचं मोठं विधान

भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा सक्रीय राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरुय.

सकाळ डिजिटल टीम

भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा सक्रीय राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरुय.

नवी दिल्ली : लोकशाही (Democracy) म्हणजे फक्त अल्पमतावर कुरघोडी करणारं बहुमत नव्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) हे मान्य नव्हतं, असं ठणकावून सांगणारे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (Chief Justice N V Ramana) यांनी विचार करायला भाग पाडतील, असे मुद्दे अलीकडेच मांडले आहेत. रमणा यांनी राजस्थानमध्ये दोन महत्त्वाच्या समारंभात भाषणं केली. आता त्यांनी आणखी एक मोठं विधान केलंय.

मागच्या काही दिवसांपासून भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा सक्रीय राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरुय. आज स्वत: रमणा यांनीच याबाबत खुलासा केलाय “मी सक्रिय राजकारणात सामील होण्यास उत्सुक होतो. पण, नियतीनं वेगळा निर्णय घेतला, म्हणून राजकारणात येणं राहून गेलं”, असं रमणा यांनी म्हटलंय.

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना रमणांनी राजकारण आणि राजकीय पक्ष यावर भाष्य केलंय. “लोकशाहीत न्यायसंस्था ही स्वतंत्र संस्था असून संविधानाप्रति बांधिलकी राखणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. मात्र, काही राजकीय पक्षांना वाटतं की, न्यायालयानं त्यांची बाजू घ्यायला पाहिजे, त्यांच्या कृतीचं समर्थन केलं पाहिजे. पण, आमची जबाबदारी केवळ राज्यघटनेप्रति बांधिलकी राखणं आहे, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT