IB Officer Ankit Sharmas postmortem report reveals
IB Officer Ankit Sharmas postmortem report reveals 
देश

धक्कादायक ! मारुन नाल्यात फेकलेल्या कॉन्स्टेबलच्या अंगावर चाकूचे १८ वार 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सीएएविरोधात दिल्लीत आंदोलनाचा भडका उडाला असून हिंसाचारात दंगेखोरांनी आयबी कॉन्स्टेबलची हत्या करून त्यांचा मृतदेह नाल्यात फेकला होता. त्याचा शविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालात आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे १८ निशाण असल्याचं समोर आले आहे.

संपूर्ण शरीरावर चाकूचे अनेक निशाण आहेत. पोटावर आणि मानेवरील घाव अधिक खोल असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते ताहिर हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ताहिर हुसैन यांची आपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. हुसैन यांच्यावर शर्मा यांची हत्या केल्याचा आणि हिंसा भडकवल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना डबल शिक्षा द्या : केजरीवाल

तत्पूर्वी, आपचे नेते हुसैन यांनीच हत्या केल्याचा गंभीर आरोप शर्मा यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शेजारच्यांनी मदतीसाठी आवाज दिला असता अंकित मदतीसाठी निघाले. त्यावेळी कुटुंबियांना त्यांना घराबाहेर जाण्यासाठी विरोध केला मात्र मदतीची गरज आहे असं सांगून अंकित बाहेर पडले ते पुन्हा घरी आलेच नाहीत असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीमध्ये सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सिसोदिया यांनी सीबीएसईला बोर्ड परीक्षा तहकूब करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT