IMA national bandh on 11th December for opposing the decision of permission given to Ayurvedic doctors to perform surgery 
देश

IMAचा ११ डिसेंबरला राष्ट्रीय पातळीवर बंद; वाचा, दवाखाने, ओपीडी, तातडीच्या सेवा सुरु राहणार की बंद?

सकाळवृत्तसेवा

पुणे : आयुर्वेदाची पदवी घेतलेल्या डॉक्टरांना आता जनरल ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसह डोळे, कान घशाची शस्त्रक्रिया करण्याची परवनागी दिली आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णायाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए)चने विरोध केला असून  ११ डिसेंबरला राष्ट्रीय पातळीवर बंद पुकारला आहे. 

सिंहगडावर पहिल्याच दिवशी हजार पर्यटक 

आय.एम.एचा राष्ट्रीय पातळीवर ११ डिसेंबरला बंद
आयुर्वेद विद्यार्थ्यांना अँलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचने विरुध्द आय.एम.ए.ने राष्ट्रीय पातळीवर हे आंदोलन सुरु केले आहे. उद्या (शुक्रवारी, ता. ११)  सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी ६  ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. तातडीक सेवा सुरु राहणार असून यात आयसीयु, अपघातात सापडलेल्या रुग्णासाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा देखील सुरु राहणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या २१९ शाखांमधील  ४५००० डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण १,१०,००० डॉक्टर्स सहभागी होतील.

मेडिकल स्टुडन्टस नेटवर्क (एम.एस.एन.) या आय.एम.ए.च्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील ३६ सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील १५००० वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी महाविद्यालयात आणि अनेक नामांकित इस्पितळात पदव्युत्तर शिक्षण घेणारे १५००० ज्युनिअर डॉक्टर्स महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (मार्ड) आणि आय.एम.ए.च्या ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क (जेडीएन) तर्फे सक्रीय सहभागी होणार आहेत.या आंदोलनाला  आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या ३४ संस्थांनी सक्रीय पाठिंबा दिलेला आहे. 

सध्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबाबत शिकवलं जाते. शस्त्रक्रिया करण्याबाबच कुठलीही स्पष्ट नियमावली नव्हती. दरम्यान, आता केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार आता आयुर्वेदाचे डॉक्टरही शस्त्रक्रिया करु शकणार आहेत. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदने दिलेल्या माहितीनुसार सरकारने परवानगी दिल्यानंतर पदव्यूतर पदवीच्या विद्यार्थ्यांना  डोळे, कान, नाक आणि घशाच्या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.  प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसेच ग्लुकोमा, मोतीबिंदू, स्तनाची गाठ, अल्स आणि पोटासंबंधी काही शस्त्रक्रियाही करता येणार आहेत. तसं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


काय आहेत केंद्र सरकारने जारी केलेले नवे नियम?
केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातच शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेशी संबंधित इतर प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना दोन टप्प्यात हे प्रशिक्षण देण्यात असून पहिला भाग एमएस (आयुर्वेद) जनरल सर्जरी आणि एमएस (आयुर्वेद) शालक्य तंत्र (डोळे, कान, नाक, घसा, डोके आणि दात रोग) यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश असेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT