Congress
Congress  esakal
देश

Congress : पंजाबमध्ये आजी-माजी काँग्रेस नेत्यांमध्येच लढत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने काँग्रेस पक्षाला भगदाड पाडण्यास सुरवात केली असून अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याने या राज्यात काँग्रेसच्याच आजी आणि माजी नेत्यांमध्ये लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

पंजाबमधील १३ लोकसभा मतदारसंघासाठी अखेरच्या टप्प्यात म्हणजे येत्या १ जून रोजी मतदान होणार आहे. पंजाबमधील निवडणुकीला अजूनही दोन महिने बाकी असून भाजपने या राज्यातील जुना सहकारी असलेला शिरोमणी अकाली दलासोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भाजपचे पंजाबमध्ये दोन खासदार असून यात अभिनेता सनी देओल (गुरुदासपूर) व सोम प्रकाश (होशियारपूर) यांचा समावेश आहे. परंतु ही संख्या वाढविण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्यास सुरूवात केली आहे.

काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते सुनील जाखड यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. गेल्या निवडणुकीत ते गुरुदासपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. परंतु सनी देओल यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर पंजाबच्या निवडणुकीपूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपने आपल्या पदरात ओढले. त्यांच्या पत्नी परनीत कौर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काँग्रेसच्या उमेदवारीवर पतियाळा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यावेळी त्या भाजपच्या उमेदवार राहणार हे जवळपास स्पष्ट आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू उमेदवार राहण्याची शक्यता आहे.

लुधियानाचे काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकला व भाजपमध्ये दाखल झाले. या वेळी ते भाजपचे लुधियानाचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे ते नातू आहेत. काँग्रेसनिष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कुटुंबातील व्यक्तीला भाजपने फोडले आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, भारत भूषण आशू व ओबीसी नेता गिल झियान, डॉ. राजकुमार छब्बेवाल हे नेते सुद्धा भाजपच्या प्रवेशासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. चरणजित सिंग चन्नी दलित नेते असून ते फरीदकोट, फतेहगडसाहिब, जालंधर वा होशियारपूर या राखीव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहू शकतात. भारतभूषण आशू हे पंजाबमधील हिंदू नेता म्हणून ओळख आहे.

मनीष तिवारींचा नकार

काँग्रेसकडून भाजपमध्ये जाणाऱ्यांच्या यादीत काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांचे नाव घेतले जात होते. ते सध्या आनंदपूरसाहिबचे खासदार आहेत. परंतु त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसून ती केवळ काँग्रेसमध्ये संभ्रम पसरविण्यासाठी अफवा पसरवीत असल्याचा दावा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT