Boy forced to lick feet E sakal
देश

UP मध्ये अल्पवयीन मुलाला पाय चाटायला लावले : 7 जणांना अटक

मुलगा भीतीने थरथर कापत होता, तर आरोपी हसत होते

हलिमाबी कुरेशी

उत्तर प्रदेश मधील रायबरेलीमध्ये दलित अल्पवयीन मुलाला, तथाकथित उच्चवर्णीय तरुणाकडुन पाय चाटायला लावल्याचा धक्कादायक व्हीडीओ समोर आलाय. उत्तर प्रदेश राज्यात जातीभेद आणि त्यातून होणाऱ्या हिंसेच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. सोशल मीडीयावर २ मिनिटे आणि ३० सेंकदाचा व्हीडाओ व्हायरल झालाय. (Upper caste boys forced Dalit minor boy to lick their feet )

दलित समाजातील हा मुलगा जमिनीवर बसलेला असून त्याचे हात त्याच्या कानावर आहेत. शिक्षा म्हणून त्याला असं बसण्यास भाग पाडल्याचं समोर येतयं. आरोपी मोटारसायकलवर बसलेला आहे. आरोपी बरोबरचे इतर तरुण हसत आहेत. त्यांच्या हसण्याचा आवाज येताय. तर पीडीत मुलगा भीतीने थरथरतोय. एक आरोपी त्या मुलाला. “ठाकूर’ म्हणण्यास डिवचत आहे. पीडीत मुलगा हा दहावीचा विद्यार्थी आहे. तर आरोपी हे त्याच्याच शाळेतील माजी विद्यार्थी आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत या घटनेत सात जणांना अटक केल्याची माहीती मिळतेय. १० एप्रिल रोजी ही घटना घडलीय. पीडीत मुलाने ही तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आलीय. आरोपीतील बहुतेक जण उच्चवर्णीय जातीतून आहेत. मुख्य आरोपी अल्पवयीन असल्याची माहीती रायबरेलीचे पोलिस अधिक्षक श्लोक कुमार यांनी दिलीय. तर सहा आरोपींचे वय १८ वर्षांवरील आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक सिंघ यांनी, आरोपींवर गुन्हा दाखल केल्याची माहीती दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mali Terrorism : मालीमध्ये ५ भारतीयांचे दहशतवाद्यांकडून बंदुकीच्या धाकावर अपहरण; अल-कायदा अन् ISIS ची दहशत वाढली

10th-12th Exams: दहावी-बारावी परीक्षेचं टेंशन घ्यायच नाही, २५ गुण मिळाल्यानंतरही उत्तीर्ण!

Manoj Jarange: "दारू पाजून कट रचवला"; जरांगे पाटील हत्याकट प्रकरणात नवा ट्विस्ट! अटक आरोपीच्या पत्नीचे धक्कादायक आरोप

Uddhav Thackeray : सरकार तुमच्या तोंडाला पाने पुसतंय, महायुतीला व्होटबंदी करा; उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन

Nashik Crime : नाशिक: ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले! 'काठे गल्ली' सिग्नलजवळ ६.५ ग्रॅम एमडीसह चौघे अटकेत

SCROLL FOR NEXT