dating-apps-in-india 
देश

भारतातील विवाहित महिलांमधील अफेअरच्या प्रमाणात वाढ; सर्वेक्षणातील खुलासा

सकाळ डिजिटल टीम

व्याभिचार हा विषय भारतात कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या खूपच चर्चिला जाणार विषय आहे. मात्र, यामध्ये पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव असल्याचे दिसून येते. व्याभिचाराच्या बाबतीत भारतातील पुरुषांचे प्रमाण हे कायमच अधिक राहिलं असून, परुषांबाबत अशा घटनांची दबक्या आवाजात चर्चा होत असली तरी त्यावर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झालेला पहायला मिळत नाही. मात्र, जर स्त्रीने अशा प्रकारचं पाऊल उचललं तर त्याची मोठी चर्चा रंगते प्रसंगी संबंधित महिलेला बदनामीलाही सामोरं जावं लागतं. मात्र, महिलांकडून होणारा हा प्रकार चांगला की वाईट यावरही आता चर्चा सुरु व्हायला लागल्या आहेत. कारण, भारतात विवाहित महिलांच्या अफेअरच्या प्रमाणात वाढ झाल्याचा खुलासा एका सर्वेक्षणातून झाला आहे. 

'या' अॅपनं केलं सर्वेक्षण 

'ग्लिडन' या फ्रेन्च एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅपद्वारे एक अभ्यास करण्यात आला या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ग्लिडन हा प्लॅटफॉर्म महिलांनी महिलांसाठी तयार केला आहे. खासकरुन ज्या महिला आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा त्यांचं लग्न झालेलं आहे अशा महिलांसाठी हे अॅप आहे. या अॅपचा प्रेम, सेक्स आणि मैत्री यासाठी मदत करणं हा उद्देश आहे. या अॅपचे भारतात सध्या १३ लाख युजर्स आहेत. 

किती टक्के महिलांचे विवाहबाह्य संबंध?

भारतातील ३० ते ६० वयोगटातील शहरी महिलांचा अॅट्युटूड, त्यांचं शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित्व याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ४८ टक्के भारतीय महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये केवळ विवाहित महिलाच नव्हे तर मुलं झालेल्या महिलांचाही यात समावेश आहे. 

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी महिलांचे प्रमाण जास्त

दि न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वेक्षणातील ६४ टक्के महिला विवाहबाह्य संबंधामध्ये आहेत कारण त्यांना लैंगिक संबंधांमध्ये समाधान किंवा त्यांच्या पतीकडून त्यांना लैंगिक सुख मिळत नाही हे एक महत्वाचं कारण आहे. या सर्वेनुसार, ७६ टक्के महिला या विवाहबाह्य संबंधांसाठी इच्छुक आहेत यांपैकी बहुतेक या उच्चशिक्षित आहेत.  तर यांपैकी ७२ टक्के महिला या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Housing Lottery: सामान्यांचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार! पुणे गृहनिर्माण मंडळाची ४१८६ घरांची ऑनलाईन सोडत, अर्ज कसा करायचा?

Omerga News : ढगफुटीमुळे आलूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; वाहतूक ठप्प

Latest Marathi News Updates Live : म्हाडा कोकण मंडळातर्फे 71 अनिवासी गाळे विक्रीसाठी लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी अर्ज प्रक्रियेला प्रारंभ

Onion Price Crisis : कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पुकारले ‘फोन आंदोलन’!

'एक काळ असा होता जेव्हा बाबा स्टेशनवर झोपायचे' ललित प्रभाकरने सांगितलं कुटुंबाचा खडतर प्रवास, म्हणाला,'आई बाबा शेतकरी...'

SCROLL FOR NEXT