Rahul Gandhi esakal
देश

Hathras Stampede : नुकसान भरपाईत वाढ करा; राहुल गांधी यांची राज्यसरकारकडे मागणी

पीडित कुटुंबीयांना आपल्या सर्वांच्या सहानुभूती आणि मदतीची गरज आहे. मृतांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना देण्यात आलेली भरपाई अतिशय कमी आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना लवकरात लवकर भरपाई दिली जावी, असेही गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.

पीडित कुटुंबीयांना आपल्या सर्वांच्या सहानुभूती आणि मदतीची गरज आहे. मृतांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना देण्यात आलेली भरपाई अतिशय कमी आहे. त्यामुळे ही भरपाई वाढवली जावी तसेच जखमींवर योग्य ते उपचार केले जावेत. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी या घटनेची पारदर्शकपणे चौकशी करणे आणि दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे,’’ असेही राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मागील आठवड्यात बाबा भोले याच्या सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली होती. यात १२० लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी हाथरसचा दौरा केला होता.

‘चेंगराचेंगरीत १२० जणांचा बळी जाण्याची घटना धक्कादायक अशी आहे. अत्यंत दु:खी मनाने मी आपणास हे पत्र लिहीत आहे. माझ्याप्रमाणे तुम्हालाही या घटनेमुळे वेदना झाल्या असतील. या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या प्रकरणाचे गांभीर्य राज्य सरकारने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे,’ असेही राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.

घटनेची चौकशी सुरू

हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यीय न्यायालयीन आयोगाची स्थापना केली होती. याशिवाय आग्रा विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुपम कुलश्रेष्ठ यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकही (एसआयटी) नेमण्यात आले आहे.

पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने आतापर्यंत नऊ लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे सत्संग घेणाऱ्या भोले बाबाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. राज्य सरकारने बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Crime: स्मशानभूमीतून महिलेची कवटी गायब; अघोरी कृत्याचा संशय, जळगावमध्ये नेमकं काय घडलं?

चांगल्या भूमिका केल्या पण मी अजूनही स्टार झालेलो नाही... सुबोध भावेचं वक्तव्य चर्चेत

Video : काळजाला भिडणारा सॅल्युट! ऑपरेशन सिंदूरमध्ये गमावला हात अन् वायुसेना पदक स्वीकारताना..CPL Varun Kumar यांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update: फुलंब्रीत जमीन अधिकार आंदोलनाचं आमरण उपोषण

पैसे घेतले; पण कार्यक्रमाला गेले नाही, हॉटेलमध्येच मद्यधुंद अन्... बॉलिवूडच्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT