PM Modi esakal
देश

Independence Day 2022: मोदींनी मोडला स्वतःचाच रेकॉर्ड; सर्वाधिक वेळ केलं भाषण

मोंदींनी स्वातंत्र्य दिनी 1 तास 22 मिनिटं 32 सेकंदांचं केलं भाषण

सकाळ डिजिटल टीम

भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा येत आहे. आज 15 ऑगस्ट 2022, यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत. सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदी यांनी नवव्यांदा ध्वजारोहण केलं आहे. यानंतर त्यांनी देशातील जनतेला संबोधित करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या दिल्या. मोंदींनी स्वातंत्र्य दिनी 1 तास 22 मिनिटं 32 सेकंदांचं भाषण करत स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे.

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत लाल किल्ल्यावरून दीड तासांचं भाषण करत सर्वाधिक वेळ भाषण करण्याचा विक्रम आज केला आहे. मोंदींनी स्वातंत्र्य दिनी 1 तास 22 मिनिटं 32 सेकंदांचं भाषण केलं आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केल आहे. यामध्ये भ्रष्टाचार, महिला, शिक्षण, कृषि, तंत्रज्ञान, विकसित भारत, नागरिकांची कर्तव्ये, डिजिटल भारत अशा वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांनी विचार व्यक्त केले आहेत.

दरवर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान लालकिल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात. 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला होता तेव्हा भारत देशाचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी 72 मिनिटं भाषण केल होत. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचं 2016 साली मोठ भाषण केल होत. 2014 पासून मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील भाषणात तीन वेळा 90 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बोलले होते. तर 2017 साली ते सर्वात कमी म्हणजे 56 मिनिटं बोलले होते. तर 2018 मध्ये 83 मिनिटं, 2019 मध्ये 92 मिनिटं, 2020 मध्ये 90 मिनिटं, तर 2021 मध्ये 88 मिनिटांचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT