India Alliance 
देश

India Alliance: इंडिया आघाडीत पुन्हा एकदा पेच... अरविंद केजरीवालांच्या भूमिकेमुळे सर्वांना टेन्शन!

पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे विरोधी पक्षांसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sandip Kapde

India Alliance:  इंडिया आघाडीत पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे. 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपाचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. मात्र बैठकीपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे इंडिया आघाडीत खळबळ माजली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील लोकसभेच्या 13 पैकी 13 जागा मागितल्या आहेत. केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर पंजाबमध्ये जागावाटप कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत पंजाबमध्ये जागावाटपावरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमधील संघर्ष वाढण्याची भीती आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रविवारी भटिंडा येथे पोहोचले होते.

पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे विरोधी पक्षांसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. आघाडील सर्व पक्ष आता वैयक्तिक भूमिका मांडत आहेत. १९ डिसेंबरला इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर पंजाबचे काम बंद पाडल्याचा आरोप केला तर दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवरही हल्लाबोल केला. पंजाबमधील भटिंडा येथे जाहीर सभेत भाषण करताना अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी लोकांकडे मतांची मागणी केली.

पंजाब ही शहीदांची भूमी आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने शहीदांच्या कुटुंबाची काळजी घेतली नाही. असे सरकार पहिल्यांदाच आले आहे, आज एखादा सैनिक किंवा पोलीस शहीद झाला तर भगवंत मान त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मानधन देतात. अलीकडेच, एक अग्निवीर अमृतपाल शहीद झाला आणि केंद्र सरकारने त्यांच्या कुटुंबाची कोणतीही काळजी घेतली नाही किंवा त्यांना कोणताही सन्मान दिला नाही, तर भगवंत मान यांनी कुटुंबाला 1 कोटी रुपये मानधन दिले, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा लोकांनी 70 पैकी 28 जागा दिल्या, दुसऱ्यांदा 67 आणि तिसऱ्यांदा 62 जागा दिल्या. यावेळी पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा मिळाल्या. मला वाटते की पंजाबमध्ये पुढच्या वेळी 117 पैकी 110 पेक्षा जास्त जागा आम आदमी पक्षाकडे जातील, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT