INDIA Alliance esakal
देश

India Alliance : ''इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा दहा दिवसांमध्ये सुटणार'', काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीतील विविध राज्यांमधील घटक पक्षांशी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीतील विविध राज्यांमधील घटक पक्षांशी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून गेल्या दोन दिवसांत जवळपास पाच राज्यांच्या नेत्यांशी काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीच्या सदस्यांनी संवाद साधून संबंधित राज्यातील काँग्रेसची स्थिती समजून घेतली.

काँग्रेसला जवळपास दहा राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटप करावयाचे आहेत. यात उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, तमिळनाडू, केरळ व जम्मू आणि काश्मीर या दहा राज्यांचा समावेश आहे.

या राज्यांमधील ३०७ लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा निर्णय घ्यावयाचा आहे. यात महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू, झारखंड व जम्मू आणि काश्मीर या पाच राज्यांत काँग्रेसच्या घटक पक्षांशी जागावाटपावर फारशी अडचण येणार नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसला घटक पक्षांशी चर्चा करावयाची आहे. त्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पहिल्यांदा राज्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहे.

राष्ट्रीय आघाडी समितीने गेल्या दोन दिवसात महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू व बिहार राज्यांमधील नेत्यांशी चर्चा केली. उत्तरप्रदेशातील नेत्यांशी आज चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रीय आघाडी समितीचे समन्वयक मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद व मोहन प्रकाश यांच्यासह उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, विधानसभेतील काँग्रेसच्या गटनेत्या आराधना मिश्रा उपस्थित होते. उत्तरप्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे ऑनलाइन सामील झाले होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भूपेश बघेल म्हणाले, राज्यातील नेत्यांशी चर्चा करीत आहोत. या संदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला जाईल. यानंतर पक्षश्रेष्ठी एक पॅनेल किंवा उच्चस्तरीय समिती तयार करून घटक पक्षांशी चर्चा करेल. ही सर्व प्रक्रिया दहा दिवसांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT