Murmu
Murmu 
देश

Republic Day: केंद्राच्या विशेष प्रयत्नांमुळं भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी - राष्ट्रपती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी भारतातील ताज्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यामध्ये महिला सक्षमीकरणासह भारताची आर्थिक स्थिती, कामगार, वैज्ञानिक, इंजिनिअर्स यांचा देशाच्या विकासातील वाटा, सीमांवर लढणारे जवानांचे आभारही त्यांनी मानले.

तसेच G20 परिषदेच्या भारताकडील अध्यक्षपदावरही भाष्य केलं. (India among fastest growing economies due to Centre proactive interventions says Pres Murmu)

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, भारताचा सध्या वेगानं विकसित होत असलेल्या पाच बड्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश झाला आहे. यामागे केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न कारणीभूत आहेत. कारण कोरोनाच्या काळात बऱ्याच क्षेत्रात चढउताराची स्थिती असल्यानं त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. त्यामुळं सरकारनं अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी पावलं उचलणं गरजेचं होतं.

केंद्राच्या सर्वोदय या मिशनमुळं अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळाली आहे. गेल्यावर्षी भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. जगातील अर्थव्यवस्थांच्या वाढीमध्ये अनिश्चितता असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं ही झेप घेणं महत्वाचं ठरलं आहे. कोविडच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला पण देश लवकरच यातून बाहेर पडला. वेळेत याबाबत पावलं उचलल्यानं हे शक्य झालं आहे. यामध्ये आत्मनिर्भर भारत, विविध क्षेत्रांसाठीच्या प्रोत्साहन योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यांचा यामध्ये मोठा वाटा आहे.

जवानांचे विशेष कौतुक

मी त्या साहसी जवानांचे विशेष कौतुक करु इच्छिते जे देशाच्या सीमांचे रक्षण करतात आणि कोणत्याही त्याग तसेच बलिदान करण्यासाठी तत्पर असतात. देशवासियांना अंतर्गत सुरक्षा पुरवणाऱ्या पॅरामिलिटरी फोर्स तसेच पोलीस दलाच्या धाडसी जवानांचे देखील मी कौतुक करते, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

शेतकरी, कामगार, वैज्ञानिक अन् अभियंत्यांचं कौतुक

मी शेतकरी, कामगार, वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या भूमिकेचं कौतुक करते ज्यांची सामुहिक शक्ती आपल्या देशाला जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय तंत्रज्ञान या विचारांशी अनुरूप प्रगती करण्यासाठी सक्षम बनवते, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT