देश

भारत जगाचे नेतृत्व करू शकतो : पंतप्रधान

वृत्तसंस्था

डेहराडून : भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची करण्याची क्षमता असून, आमची ही विकास यात्रा जगातील कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. आजमितीस आमच्या देशातील राज्यांमध्ये पुढे जाण्याची स्पर्धा लागली आहे. जगातील सर्व मोठे ब्रॅंड हे आज "मेक इन इंडिया'चा घटक आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ते येथे "उत्तराखंड इन्व्हेस्टर समिट'च्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. 

मोदी म्हणाले, ""ऑटोमोबाईल सेक्‍टरमध्ये भारताने खूप प्रगती केली असून, अन्नप्रक्रिया उद्योगाला अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही या क्षेत्रात शंभर टक्के परकी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. अन्नधान्य, भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून उत्तराखंडकडे "ऑर्गेनिक' राज्य बनण्याची क्षमता आहे. राज्यामध्ये गुंतवणुकीला अनुकूल असे वातावरण तयार करण्यात आले असून, सर्वच कायदेशीर प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्याने उद्योजक देखील याच राज्यात येऊ लागले आहेत.

उत्तराखंडच्या वैविध्याचे कौतुक करताना मोदी म्हणाले, की या राज्याकडे प्रकृती, संस्कृती आणि योग असे पर्यटनाचे पूर्ण पॅकेज असून हे आदर्श स्थळ आहे. मागील अठरा वर्षांमध्ये प्रथमच 13 जिल्ह्यांमध्ये 13 नवी पर्यटस्थळे तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्याने याचा शेतकऱ्यांना देखील लाभ होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT