Corona Update 
देश

Corona Update: देशात पुन्हा 45 हजारांपेक्षा अधिक रुग्ण संख्या

कार्तिक पुजारी

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 45 हजार 083 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 35 हजार 840 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्या कोरोनाचे 3 लाख 68 हजार 558 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिलीये . देशाचा रिकव्हरी रेट 97.53% झालाय. देशात आतापर्यंत 63.3 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 73.8 लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. (India Latest Corona News)

केरळमधील स्थिती चिंताजनक

केरळमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून 30 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. स्थिती इतकी गंभीर आहे की, फक्त पाच दिवसांमध्ये केरळमध्ये कोरोनाचे जवळपास दीड लाख रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. केरळमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील रुग्णसंख्या 45 हजारांच्या पुढे आढळून येत आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू केला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती

राज्यात मृत्यूचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत कमी झाला असून 126 रुग्ण दगावले. शुक्रवारी 170 रुग्ण दगावले होते. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1 लाख 37 हजार 226 इतका झाला आहे. दिवसभरात 4 हजार 831 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64 लाख 52 हजार 273 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढून 51 हजार 821 इतकी झाली. तर दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून 4 हजार 455 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 59 हजार 906 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.02 % एवढे झाले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT