coronavirus sakal
देश

Coronavirus : कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सावधान - मांडवीया

चीनमध्ये पुन्हा उद्रेक झालेल्या कोरोना महामारीचा भारतात व्यापक शिरकाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार सातत्याने तयारी करत आहे.

मंगेश वैशंपायन

चीनमध्ये पुन्हा उद्रेक झालेल्या कोरोना महामारीचा भारतात व्यापक शिरकाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार सातत्याने तयारी करत आहे.

नवी दिल्ली - 'देशात कोरोना पसरू नये अशीच सरकारची इच्छा आहे. मात्र कोणतीही शक्यता लक्षात घेऊन रूग्णालयांनी सज्जता बाळगावी व दिल्लीच्या ‘सफदरजंग' रूग्णालयाप्रमाणे प्रत्येक रूग्णालयांतील कोरोना वॉर्ड तयार ठेवावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज केली आहे.

चीनमध्ये पुन्हा उद्रेक झालेल्या कोरोना महामारीचा भारतात व्यापक शिरकाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार सातत्याने तयारी करत आहे. त्याअंतर्गत आज देशभरातील रुग्णालयांमध्ये ‘कोविड-१९ -मॉक ड्रील' घेऊन वैद्यकीय तयारीचा आढावा घेण्यात आला.

आजच्या कोवीड मॉक ड्रिलचा उद्देश रूग्मालयांतील कोरोना वॉर्ड, औषधे, उपकरणे आणि मनुष्यबळाशी संबंधित तयारीची चाचणी करणे हा होता. आरोग्यमंत्री मांडविया यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात कोविडशी संबंधित तयारीचा आढावा घेतला. त्यांच्या देखरेखीखालीच हे मॉक ड्रील घेण्यात आली.

सर्व राज्यांनीही मॉक ड्रिल घ्यावे असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले होते. या दरम्यान, राज्ये कोरोनाला तोंड देण्यासाठी कशी तयार आहेत हे सरकारच्या लक्षात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा किती आहेत? रुग्णालयांमध्ये पीपीई किट आहेत का? पुरेसे व्हेंटिलेटर आहेत का? कोविड वॉर्ड तयार आहेत का? बेडची संख्या आणि वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता काय आहे? याबाबतच्या तयारीचा आढावा या मॉक ड्रीलच्या माध्यमातून घेण्यात आला.

सफदरजंग रूग्णालयातील मॉक ड्रीलची पाहणी केल्यावर मांडवीया यांनी सांगितले की जगभरात कोविडची सद्य परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संबंधित यंत्रणा व अधिकाऱ्यांना अत्यंत सतर्क राहण्यास सांगितले आहे. चीनमधील रूग्णसंख्येत स्फोटक वाढ झाल्यानंतर संपूर्ण जग कोरोनाबाबत सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यापासून अनेक बैठका घेतल्या आहेत. नवीन व्हायरस मोठ्या प्रमाणावर देशात पसरणार नाही याची सरकारला सर्व प्रकारे खात्री करायची आहे.

काही धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास रुग्णालयांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे असे सांगून मांडवीया म्हणाले की दिल्लीचे सफदरजंग रुग्णालय कोरोनाशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, इतर रुग्णालयेही त्याच धर्तीवर तयार व्हावीत अशी सरकारची इच्छा आहे. सर्वत्र कोरोना प्रोटोकॉल पाळले जातील याची काळजी राज्याचे आरोग्य मंत्री घेत आहेत.

दरम्यान कोरोनाबाबत लोकांना चुकीची माहिती देणे टाळण्याचेही आवाहन मांडवीया यांनी डॉक्टरांना केले आहे. कोरोनाबद्दल कोणत्याही प्रकारचे अंदाज बांधणे किंवा अधिक असत्यापित माहिती देणे योग्य नाही. जेव्हा कोणतीही पडताळणी माहिती असेल तेव्हा ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे असे मांडवीया म्हणाले.

भारत बायोटेकची ‘इन्कोव्हॅक' सज्ज

कोरोनावर नाकाद्वारे देण्यात येणारी लस (नोजल व्हॅक्सीन) नागरिकांना देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या लसीला इन्कोव्हॅक असे नाव देण्यात आले आहे. पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत (जानेवारी) ही लस देशातील रूग्णालयांत उपलब्ध करून दिली जाईल असे सांगण्यात आले. भारत बायोटेकने बनविलेली ही अनुनासिक लस ‘कोविन अॅप'द्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्र सरकारकडून त्याची किंमत खासगी रुग्णालयांमध्ये ८०० रूपये आणी सरकारी रूग्णालयांसाठी प्रति डोस ३२५ रूपये ठरविण्यात आली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात इन्कोव्हॅक लोकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इन्कोव्हॅक ही भारतातील पहिली ‘नोजल' लस असेल.

बूस्टर डोस म्हणून ती घेतली जाऊ शकते. देशातील १४ ठिकाणी ३१०० लोकांवर याची इन्कोव्हॅकची नुकतीच चाचणी घेण्यात आली. डिसेंबरच्या सुरुवातीला भारत बायोटेकची ही इन्कोव्हॅक लस बाजारात आणण्यास परवानगी देण्यात आली होती. ही लस कमी पैशात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT