Asaduddin Owaisi 
देश

Asaduddin Owaisi: हिजाब घातलेली एक मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होणार; ओवैसींना विश्वास

First Muslim prime minister: ओवैसी हे सलग चारवेळा हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना देशातील मुस्लिमांचे नेतृत्व करणारे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाते. ओवैसी हे सलग चारवेळा हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. ते पुन्हा रिंगणात असून हैदराबादमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे. ओवैसी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशाला एक मुस्लीम पंतप्रधान मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

देशाला मुस्लीम पंतप्रधान मिळेल असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न ओवैसींना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले आहेत की, 'इंशाल्लाह, हिजाब घातलेली एक महिला देशाचं नेतृत्व करेल. ही वेळ नक्कीच येईल. मी तो दिवस पाहण्यासाठी कदाचित जिवंत नसेल, पण हे एक दिवस होणार आहे. इंशाल्लाह.'

असदुद्दीन ओवैसी हे मुस्लिमांचे एक प्रमुख नेते म्हणून उदयाला आले आहेत. त्यांचा एमआयएम पक्ष देशभरात पाय पसरु लागला आहे. मुस्लीम, इतर मागासवर्ग आणि इतर अल्पसंख्य यांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपला हरवणे हा एमआयएमचा अजेंडा आहे. मात्र, ओवैसींनी इंडिया आघाडीसोबत जवळीक केलेली नाही. औवेसींनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत.

इंडिया आघाडीसोबत हात मिळवण्याबाबत ओवैसी म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार नव्हतो अशी गोष्ट नाही. आमचे महाराष्ट्रातील अध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी सार्वजनिकरित्या तीनवेळा इंडिया आघाडीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. पण, पुढून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही एकट्यानेच लढण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमचं राजकीय काम सुरुच ठेवू.

भाजपला आव्हान देणे कठीण आहे असं वाटत नाही का? असा प्रश्न ओवैसींना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आयुष्य हेच एक आव्हान आहे. जीवनात आव्हान नसतील तर मजा देखील राहात नाही. आम्ही खात्री देतो की आम्ही मेहनत करत राहू. लोकांनी ठरवलं तर आम्ही जिंकू. आम्ही जिंकलो नाही तरी आम्ही आमच्या पक्षाच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया बनवतोय हे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT