India Gandhi Birth Anniversary Special 7 Major And Historical Decisions Of Indira Gandhi
India Gandhi Birth Anniversary Special 7 Major And Historical Decisions Of Indira Gandhi 
देश

Indira Gandhi Birth Anniversary: इंदिरा गांधीच्या 'या' 7 निर्णयांनी बदलला होता भारताचा इतिहास!

सकाळ डिजिटल टीम

Indira Gandhi Birth Anniversary: 'आयर्न लेडी ऑफ इंडिया' अशी ओळख असणाऱ्या इंदिरा गांधी यांची आज जयंती. 19 नोव्हेंबर 1917 रोजी त्यांचा जन्म झालेला. त्यांच्या राजनितिक काळात त्यांनी काही असे निर्णय घेतले ज्यामुळे भारताचा इतिहासच बदलून गेला. त्यांच्या अशाच काही मोठ्या निर्णयांबद्दल जाणून घेऊया.

1. बँकांचे राष्ट्रीयीकरण (1969)

19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने एक मोठा निर्णय घेतला. या यानुसार भारतामधल्या 14 खाजगी बँकांचे नॅशनलायझेशन केलं गेलं. देशातील सुमारे 70 टक्के डिपॉझिट्स या 14 बँकांमध्ये होत्या. हा निर्णय निघाल्यानंतर या बँकांची मालकी सरकारकडे गेली. आर्थिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी हे केल गेलं. या अध्यादेशाला बँकिंग कंपन्या अ‍ॅक्विझिशन अँड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज असे म्हणतात. त्यानंतर याच नावाचा कायदा आला.

2. पाकिस्तानचे दोन तुकडे (1971)

पूर्व पाकिस्तानात झालेलं बंगाली नेत्याचं वर्चस्व पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांना अजिबात पटलं नव्हत. यामुळे सतत हिंसाचार सुरू झालेला; यामुळे पूर्व पाकिस्तानात राहणारे कित्येक रहिवासी भारतात स्थलांतरित होऊ लागले. शेवटी 1971 मध्ये इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तान अर्थात बांग्लादेशला पूर्ण पाठिंबा देऊन पाकिस्तानचे दोन तुकडे केले. परिणामी भारत पाकिस्तान मध्ये युद्ध झाले ज्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला आणि भारताने त्यांच्या जवळपास 90,000 सैनिकांना युद्धकैदी बनवले.

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

3. प्रिव्ही पर्स रद्द करणे

स्वातंत्र्यानंतर, ज्या राजघराण्यांनी आपली संस्थानं भारतात विलीन केली. त्यांना ठराविक रक्कम द्यायला सुरुवात झाली. या रकमेला राज भट्टी किंवा प्रिव्ही पर्स म्हणत. इंदिरा गांधींनी 1971 साली राज्यघटनेत दुरुस्ती करून राजेशाहीची ही प्रथा बंद केली. त्यांच म्हणणं होत की अशी सरकारी पैशाची उधळपट्टी करण्याची गरज नाहीये.

4. 1974 मध्ये पोखरण येथे अणुचाचणी

18 मे 1974 हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस होता. या दिवशी भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी करून जगाला चकित केले. या ऑपरेशनचे नाव होते स्माईलिंग बुद्धा. याचे श्रेय देखील इंदीरा गांधी यांना जातं.

5. आणीबाणी (1975-77)

इंदिरा गांधींबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल दिला. त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यांना संसदेचा राजीनामा देण्यासही सांगण्यात आले. पण इंदिरा गांधींनी उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर देशभरात निदर्शने सुरू झाली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. हे सर्व पाहता इंदिरा गांधींनी 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू केली आणि मोठ्या संख्येने विरोधकांना अटक करण्याचे आदेश दिले. भारतीय लोकशाहीत या दिवसाला 'काळा दिवस' म्हणतात.

6. ऑपरेशन ब्लू स्टार (1984)

जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या सैनिकांना भारताची फाळणी करायची होती. पंजाबींसाठी वेगळा देश 'खलिस्तान' बनवावा, अशी त्यांची मागणी होती. भिंद्रनवालेचे साथीदार सुवर्ण मंदिरात लपून बसले होते. त्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन ब्लूस्टार' चालवले होते. या कारवाईत भिंद्रनवाले आणि त्याचे साथीदार मारले गेले. यासोबतच काही सामान्य नागरिकांचाही बळी गेला. पुढे या ऑपरेशन ब्लूस्टारचा बदला घेण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली.

7. ऑपरेशन मेघदूत

1984 मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन मेघदूत केले आणि पाकिस्तानची कबर खोदली. या ऑपरेशनला इंदिरा गांधींनीच मान्यता दिली होती. खरं तर 17 एप्रिल 1984 रोजी पाकिस्तानने सियाचीनवर कब्जा करण्याची योजना आखली होती, ज्याची माहिती भारताला मिळाली. भारताने त्याआधी सियाचीन काबीज करण्याची योजना आखली आणि या ऑपरेशनचे सांकेतिक नाव 'ऑपरेशन मेघदूत' होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT