military spender
military spender 
देश

भारत लष्करी खर्चात कितव्या स्थानी? अमेरिका-चीनच्या जवळसुद्धा नाही; सर्वात बलाढ्य 10 देशांची नावे जाणून घ्या

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जगभरात युद्धाची स्थिती आहे. पश्चिम आशियामध्ये संघर्ष पेटला आहे. त्यामुळे कधीही मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकेल अशी स्थिती आहे. त्यातच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिपरी) जगातील देशांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगातील कोणते देश लष्करावर किती खर्च करत आहेत याची माहिती देण्यात आली आहे. सिपरीच्या रिपोर्टनुसार जगामध्ये सैन्य आणि शस्त्रांवर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे.

२०२३ मध्ये सैन्य आणि शस्त्रास्त्रांवर होणारा खर्च विक्रमी २४४३ अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचला आहे. भारताने लष्करी खर्चामध्ये वाढ केली आहे. लष्करी क्षेत्रावर खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. (India is 4th largest military spender after US China Russia)

लष्करी खर्चामध्ये झाली वाढ

रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये भारताने लष्करावर ८३.६ अब्ज डॉलर खर्च केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा खर्च ४.२ टक्क्यांनी जास्त आहे. २०२० मध्ये भारताचा चीनसोबत संघर्ष निर्माण झाला होता. तेव्हापासून भारताने आपल्या क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे. चीनला लागून असलेल्या भागात पायाभूत संरचना निर्माण करण्यात आल्या आहेत. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, टँक, तोफा,रॉकेट, मिसाईल आयात आणि निर्मिती करण्यात येत आहेत.

२०२२ मध्ये देखील भारत लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा जगातील चौथा देश होता. त्यावेळी भारताचा लष्करी क्षेत्रावरील खर्च ८१.४ अब्ज डॉलर होता, २०२१ च्या तुलनेमध्ये तो ६ टक्क्यांनी जास्त होता. २०१३ पासून लष्करी क्षेत्रातील खर्चामध्ये ४७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जागतिक स्थिती पाहता आणि चीन-पाकिस्तान यांचा शेजार असल्याने भारताने सर्व दृष्टीने सक्षम असण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

रिपोर्टनुसार, लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनने २०२३ मध्ये आपल्या सैन्यावर २९६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा खर्च ६ टक्के जास्त आहे. २०२२ मध्ये चीनने २९२ अब्ज डॉलर इतका खर्च केला होता. चीनच्या शेजारी असलेल्या अनेक देशांनी लष्करी खर्च वाढवला आहे. यामागचे कारण चीनसोबतचा तणाव हे आहे.

लष्करावर सर्वाधिक खर्च करणारे १० देश (The 10 largest military spenders)

१. अमेरिका- ९१६ अब्ज डॉलर

२. चीन- २९६ अब्ज डॉलर

३. रशिया- १०९ अब्ज डॉलर

४. भारत - ८४ अब्ज डॉलर

५. सौदी अरेबिया- ७६ अब्ज डॉलर

६. यूके - ७५ अब्ज डॉलर

७. जर्मनी -६७ अब्ज डॉलर

८. युक्रेन - ६५ अब्ज डॉलर

९. फ्रान्स- ६१ अब्ज डॉलर

१०. जपान ५० अब्ज डॉलर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT