PM Modi
PM Modi  E sakal
देश

भारत गहू-तांदळापेक्षा दूध उत्पादनात जगात अव्वल : PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : भारत दरवर्षी ८.५ लाख कोटी रुपयांच्या दुधाचे उत्पादन (India Milk Producation) करतो. दुधातून होणारी उलाढाल ही गहू आणि तांदळापेक्षा जास्त आहे. तसेच लहान शेतकरी दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठे लाभार्थी आहेत, असं पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले. आज त्यांनी बनासकांठामधील दियोदर येथे नवीन डेअरी कॉम्प्लेक्स आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

आज भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांची उपजीविका दुधावर अवलंबून असताना, भारत वर्षाला ८.५ लाख कोटी रुपयांचे दूध उत्पादन करतो. पण, याकडे बड्या अर्थतज्ज्ञांसह देशातील अनेक लोकांचे दुर्लक्ष होतेय. खेड्यांमधील विकेंद्रीत अर्थव्यवस्था याचं उदाहरण आहे. गहू आणि तांदळामधून होणारी उलाढाल देखील दुधाच्या उत्पादनइतकी नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम बनविणे हाच नवीन डेअरी कॉम्प्लेक्स आणि बनास डेअरीच्या बटाटा प्रक्रिया प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे या प्रदेशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येईल, असंही पंतप्रधान म्हणाले. तसेच बनास कम्युनिटी रेडिओ स्टेशन, पालनपूर येथील चीज उत्पानद प्रकल्प, दामा येथील सेंद्रीय खत प्रकल्प हे सर्व देशाला समर्पित असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

दियोदर येथील बटाटा प्रक्रिया प्रकल्प फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, आलू टिक्की, पॅटीस इत्यादी विविध प्रकारचे प्रक्रिया केलेले बटाटा उत्पादने तयार करणार आहे. यापैकी काही उत्पन्न् इतर देशांना निर्यात केले जाणार आहे. बनासकांठा जिल्ह्यातील दियोदर येथील नवीन डेअरी कॉम्प्लेक्स हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. इथं सुमारे 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करता येईल. सुमारे 80 टन लोणी, एक लाख लिटर आइस्क्रीम, 20 टन कंडेन्स्ड मिल्क आणि 6 टन चॉकलेट दररोज तयार करेल. या प्रकल्पासाठी जवळपास ६०० कोटींहून अधिक खर्च आला आहे. याच प्रकल्पाचे आज पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT