5G spectrum google
देश

मुंबई पुण्यासह 13 शहरात लवकरच 5G सेवा होणार सुरू

केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाल मंजुरी दिली असून २६ जुलै २०२२ रोजी हा लिलाव होण्याची शक्यता आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारतातील 13 शहरात लवकरच ५जी सेवा सुरू होण्याची चिन्हे आहत. त्यासाठी केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. 26 जुलै 2022 रोजी हा लिलाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लिलावानंतर भारतातील तब्बल १३ शहरामध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. या शहरामध्ये मुंबई आणि पुण्याचाही सामावेश आहे.

(5G Service Starting Soon)

केंद्र सरकार 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करणार असून यामध्ये 600, 700, 800, 1800, 2100, 2300 आणि 2500 मेगाहर्ट्झच्या बँडचा लिलाव होणार आहे. स्पेक्ट्रमची किंमत 5 लाख कोटी रूपये ठेवली असून तब्बल 20 वर्षांसाठी हा करार असणार आहे. ही सेवा 4G च्या तुलनेत 10 पट वेगवान असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान भारतीय दूरसंचार विभागाने याआधी 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशातील दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, बंगळूर, चंदीगढ, गांधीनगर, हैद्राबाद, गुरूग्राम, कोलकत्ता, जामनगर, लखनऊ या शहरात पहिल्यांदा ही सेवा सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान सध्या भारतातील काही भागात 4G सेवाही पोहोचली नसताना देशात काही भागात 5G सेवा सुरू होणार आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत ही सेवा सुरू होण्याची चिन्हे असून जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या तीनही कंपन्यांमध्ये ही सेवा देण्यासाठी चुरस आहे.

दरम्यान यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत 5G लॉन्च केले जाणार असल्याचं दूरसंचार राज्यमंत्री देवसिंग चौहान यांनी सांगितलं होतं. दरम्यान या संशोधनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारची दूरसंचार संशोधन संस्था आणि TCS कंपनी या दोन संस्थांकडून यासाठी संशोधन सुरू आहे. दरम्यान हा लिलाव 20 वर्षासाठी असणार असल्याचं दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT