

Rohit Sharma | Mumbai Indians
Sakal
२८ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेसाठी फ्रँचायझींची तयारी सुरू झाली आहे. पाचवेळचे विजेते मुंबई इंडियन्सही यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास सज्ज आहे.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गेल्या वर्षी चांगला खेळ करताना प्लॅऑफमध्येही जागा मिळवली होती. मात्र एका गोष्टीची बरीच चर्चा झाली होती, ती गोष्ट म्हणजे रोहित शर्माला (Rohit Sharma) इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याची. गेल्या हंगामात रोहित काही सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player) म्हणून खेळला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामातही त्याची भूमिका काय असेल यावर चर्चा सुरू आहे.