Corona Virus esakal
देश

मुंबईत आढळला कोरोनाचा नवा XE व्हेरियंट; भारतातील पहिलीच नोंद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोनाचा काळ (Corona Time) आता संपल्यात जमा झाला असतानाच आता आणखी एक नवा कोरोनाचा व्हेरियंट भारतात पहिल्यांदाच आढळून आला आहे. XE नामक हा व्हेरियंट असून तो आज मुंबईत आढळून आला. ३७६ नमुन्यांची चाचणी केल्यानंतर यांपैकी एक रुग्ण या नव्या XE व्हेरियंटचा (XE Variant) संसर्गबाधित आढळून आला आहे. इंडिया टुडेनं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

हा नवा XE व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षाही जास्त पसरणारा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये (UK) आढळला होता. ताज्या सिरो सर्व्हेच्या अहवालानुसार, मुंबई महापालिकेनं म्हटलं की, मुंबईतील २३० नमुने सिरो सर्व्हेसाठी पाठवण्यात आले होते, यांपैकी २१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. या रुग्णांना ऑक्सिजन किंवा आयसीयूची गरजही भासली नव्हती. यांपैकी XE व्हेरियंटचा एक रुग्ण तर आणखी एक Kappa व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, जे २१ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते त्यांपैकी नऊ जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलो हेते. तर इतर सर्वांनी एकही डोस घेतला नव्हता.

हा नवा XE व्हेरियंट ओमिक्रॉन BA.1 आणि BA.2 या दोन्ही व्हर्जन्सच्या म्युटंट हायब्रिड व्हर्जन आहे. सध्या जगभरात या व्हेरियटंचे खूपच कमी संसर्गबाधित आढळून आले आहेत. जागतीक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, हा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षआ १० टक्के जास्त संसर्गकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT