UPI-PayNow esakal
देश

UPI-PayNow : भारत-सिंगापूर क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटीचा नेमका फायदा कोणाला?

या कराराचा फायदा नक्की कोणाला होणार आहे ते जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

UPI-PayNow : भारत आणि सिंगापूरमध्ये डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील सर्वात मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या करारातंर्गत भारतातील UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि सिंगापूरचे PayNow यांना जोडून दोन्ही देशांदरम्यान क्रॉस-बॉर्डर पेमेंट कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली आहे.

यासेवेमुळे दोन्ही देशातील नागरिकामध्ये पैशांची देवाणघेवाण तसेच काही सेकंदात पैसे हस्तांतरीत करणे सोपे होणार आहे. UPI आणि PayNow चा वापर करून, सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय UPI द्वारे भारतात पैसे ट्रान्सफर करू शकतील. मात्र या कराराचा फायदा नक्की कोणाला होणार आहे ते जाणून घेऊया.

UPI म्हणजे काय?

UPI किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केले आहे, ही एक क्विक पेमेंट मेथड आहे जी मोबाईल फोनद्वारे त्वरित मनी ट्रान्सफर करण्यास सक्षम आहे. यामुळे व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) तयार करून, बँक खात्याच्या डिटेल्स शेअर करण्याचा धोका टाळला जातो. रीअल-टाइम सिस्टम परसन टू परसन (P2P) आणि परसन-टू-मर्चंट (P2M) पेमेंट या दोन्हींना समर्थन देते.

PayNow म्हणजे काय?

भारताच्या फास्ट पेमेंट सिस्टम प्रमाणेच - UPI - PayNow ही सिंगापूरची समकक्ष आहे. केवळ एका मोबाइल क्रमांकासह, यूजर्स सिंगापूरमधील एका बँक किंवा ई-वॉलेट अकांउटमधून दुसऱ्या बँकेत पैसे सेंड आणि रिसीव्ह करू शकतात. हे पीअर-टू-पीअर पेमेंट लिंकेज देशातील सहभागी बँका आणि नॉन-बँक फायनांशियल इंस्टीट्युट (NFIs) द्वारे सक्षम केले आहे.

क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हीटीचं नेमकं कार्य काय?

हा करार एकदा लागू झाल्यानंतर, मोबाइल फोन नंबर वापरून भारतातून सिंगापूरमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकते आणि त्याउलट UPI चा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस वापरून केला जाईल.

या प्रकल्पाचा सिंगापूरमधील भारतीय लोकांना, विशेषत: स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी अपेक्षा आहे कारण इतर पेमेंट सिस्टममध्ये प्रवेश न करता दोन्ही देशांमध्ये फास्ट आणि इझी मनी ट्रान्सफर करण्यास अनुमती देते. आरबीआय रेमिटन्स सर्व्हे, 2021 नुसार, सिंगापूर भारतासाठी अव्वल चार इनवर्ड रेमिटन्स मार्केटमध्ये आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) दस्तऐवजानुसार, सध्या प्रवासी भारतीयांची लोकसंख्या (2022), सिंगापूर निवासी भारतीय आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींसह अंदाजे 6.5 लाख एवढी आहे.

मॉनेटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूर (एमएएस) चे मुख्य फिनटेक अधिकारी सोपनेंदू मोहंती, कोलकाता येथे आर्थिक समावेशाबाबत G20 फर्स्ट वर्किंग ग्रुपच्या बैठकीच्या वेळी म्हणाले होते की सिस्टमच्या एकत्रीकरणामुळे रेमिटन्स पाठवण्याचा खर्च 10 टक्क्यांपर्यंत कमी होईल.

सिंगापूर आणि भारत यांच्यातील रेमिटन्सची किंमत आणि अकार्यक्षमता कमी करून, PayNow-UPI लिंकेजचा थेट फायदा सिंगापूर आणि भारतीय लोकांना आणि व्यवसायांना होईल विशेषत: जे या पेमेंट पद्धतीवर खूप अवलंबून आहेत. PayNow आणि UPI हे त्यांच्या राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधांचे अविभाज्य घटक आहेत हे लक्षात घेता, दोन प्रणालींमधील दुवा देखील दोन देशांमधील अधिक व्यापक डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि इंटरऑपरेबिलिटी स्थापित करण्याचा मार्ग मोकळा करते,” असे मोहंती म्हणाले.

आरबीआयने म्हटले आहे की भारत आणि सिंगापूर दरम्यान क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा दुवा महत्त्वाचा टप्पा ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT