देश

'अग्नि-प्राइम'ची यशस्वी चाचणी; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

नामदेव कुंभार

ओडिसाच्या किनारपट्टीवर भारताने सोमवारी अग्नि प्राइम या मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. या अत्याधुनिक मिसाइलची क्षमता एक ते दोन हजार किलोमीटर पर्यंतअसून मोबाइलद्वारे लाँच करता येईल. अग्नि-प्राइमची यशस्वी चाचणीमुळे भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आणखी भर पडली आहे.

डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 10:55 वाजता अग्नि प्राइम मिसाइलची चाचणी यशस्वी झाली आहे. ओडिसाच्या पूर्व किनारपट्टीवरील अब्दुल कलाम आयसलँडमध्ये चाचणी घेण्यात आली. अत्याधुनिक पद्धतीनं अग्नि प्राइम मिसाईल डिझाइन करण्यात आली आहे. इतर मिसाइलपेक्षा अग्नि-प्राइम मिसाइल लहान आणि वजनानं हलकी आहे. चार हजार किलोमीटर रेंजच्या अग्नि-4 आणि पाच हजार किलोमीटरच्या अग्नि-5 या मिसाइलमध्ये वापरण्यात येणाऱ्या अत्यधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अग्नि प्राइम मिसाइलला तयार करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, अग्नि प्राइम ही मिसाइल मोबाइलद्वारे लाँच करण्यात येईल. तसेच याची क्षमता एक ते दोन हजार किलोमीटर इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT