K K patel hospital google
देश

"दहा वर्षांत देशाला विक्रमी संख्येने डॉक्टर मिळतील" - मोदी

देशातील प्रत्येक जिल्ह्यात परवडण्याजोगी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचे ध्येय ठेवल्यास १० वर्षांत देशाला विक्रमी संख्येने नवे डॉक्टर्स मिळतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

नमिता धुरी

नवी दिल्ली : पुढील दहा वर्षांत देशाला विक्रमी संख्येने नवे डॉक्टर मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुजरातमधील भूज येथे त्यांनी के. के. पटेल सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे उद्घाटन शुक्रवारी केले. यावेळी ते बोलत होते.

आपल्या भाषणात मोदी म्हणाले, "भूजमधील हे रुग्णालय रुग्णांना कमी दरात चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल. दोन दशकांपूर्वी गुजरातमध्ये १ हजार १०० जागांसह केवळ ९ वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध होती. आज आपल्याकडे ६ हजार जागांसह ३६ महाविद्यालये आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यात परवडण्याजोगी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचे ध्येय ठेवल्यास १० वर्षांत देशाला विक्रमी संख्येने नवे डॉक्टर्स मिळतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

चांगल्या वैद्यकीय सुविधांमुळे केवळ आजारांवर उपचार केले जातात असं नाही तर, यामुळे सामाजिक न्यायही जपला जातो. गरीबांना स्वस्त आणि चांगली आरोग्य सेवा मिळाली तर त्यांच्या व्यवस्थेवरील विश्वास दुणावेल, असे मोदी म्हणाले. नो

हे रुग्णालय भूजच्या कच्छी लेवा पटेल समाजातर्फे उभारण्यात आले आहे. २०० खाटांचे हे रुग्णालय कच्छमधील पहिले चॅरिटेबल सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय आहे. येथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिस सर्जरी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, न्युक्लिअर मेडिसीन, न्युरो सर्जरी, सांधे प्रत्यारोपण, इत्यादी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Raigad Dhangar Shetkari News: पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट, शिक्षणापासून वंचित पिढी..

Everest Base Camp: तन्मय नाईकने १७,४०० फूटांवर गाठले ध्येय, विरारचा ट्रेकर हिमालयात चमकला, ९ जणांतून एकटाच यशस्वी!

SCROLL FOR NEXT