U19 Asia Cup India Win: 'कमालीची फिनिश...' लेक आर्यवीरसह युवा टीम इंडियाचं सेहवागकडून भरभरून कौतुक; सचिन, गांगुलीकडूनही शाबासकी

Cricket Fraternity Reacts on Team India’s U19 Asia Cup Victory: भारताच्या युवा संघाने शनिवारी १९ वर्षांखालील आशिया करंडक पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर पराभूत करत जिंकला. या विजयानंतर भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरनेही या सामन्यात अर्धशतक केले होते.
India vs Pakistan U19 Asia Cup 2026

U19 Team India | Asia Cup Final

Sakal

Updated on: 

Cricket Fraternity Reacts on Team India’s U19 Asia Cup Victory : आव्हान ३३८ धावांचे. त्यासमोर अवस्था ८ बाद २५२... पण येथूनच हरलेला सामना जिंकण्याचा पराक्रम भारताच्या युवकांनी केला आणि थरारक सामन्यात पाकिस्तानचा एक विकेटने पराभव करणाऱ्या भारतीयांनी १९ वर्षांखालील आशिया करंडकावर आपले नाव सन्मानाने कोरले. या स्पर्धेत साखळी सामन्यात भारताची पाकिस्तानविरुद्ध हार झाली होती.

गतवेळेस आयुष म्हात्रेच्या कर्णधारपदी खेळलेल्या आणि वैभव सूर्यवंशीचा समावेश असलेल्या संघाचाही अंतिम सामन्यात पराभव झाला होता. या दोन्ही पराभवांची परतफेड लक्ष्य रायचंदानी याच्या भारतीय संघाने केली.

अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात दहाव्या क्रमांकाचा फलंदाज मोहित उल्वा हिरो ठरला. अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना त्याने शानदार चौकार मारला आणि भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. भारताच्या या रोमांचक विजयावर अनेक आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे.

India vs Pakistan U19 Asia Cup 2026
IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?
Loading content, please wait...