Ajit Doval 
देश

Taliban Issue: भारताने आयोजित केली बैठक; पाकलाही निमंत्रण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या देशांच्या या विषयावर सातत्याने बैठका सुरु आहेत. या पार्श्वभूमीवरच आता भारतात देखील बैठक होणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पाकिस्तान आणि रशियाला देखील निमंत्रण देण्यात आलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सुत्रांनी देखील याबाबत पुष्टी दिलीय. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांना मागील आठवड्यात याबाबतचं निमंत्रण मिळालं आहे. या देशांशिवाय चीन, इराण, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांना देखील निमंत्रण देण्यात आलंय. या बैठकीचं अध्यक्षस्थान भारताचे NSA अजित डोवाल भुषवणार असल्याची माहिती आहे.

या मुद्यांवर होईल चर्चा

या बैठकीमध्ये अफगाणिस्तानातील मानवी संकट आणि मानवाधिकारांच्या मुद्यावर चर्चा होईल. याशिवाय सुरक्षा मुद्यांवर देखील चर्चा केली जाईल. तालिबानकडून जगाला ज्या अपेक्षा आहेत, त्याबाबत आणि तालिबानी सरकारच्या शासन प्रणालीवर देखील चर्चा होईल. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत आणि शिक्षणावर देखील चर्चा होणार आहे.

तालिबानला निमंत्रण नाही

भारत सरकारे अद्याप तरी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीसाठी तालिबानला निमंत्रण दिलेलं नाहीये. तालिबानकडून जगाला ज्या अपेक्षा आहेत, त्या अद्यापतरी पूर्ण होताना दिसत नाहीयेत. खासकरुन मानवाधिकाराशी निगडीत मुद्यांवर तालिबानकडून अधिक अपेक्षा आहेत. यामध्ये महिला, मुले आणि अल्पसंख्याकांच्या मानवाधिकारांचा समावेश आहे.

रशियाच्या बैठकीला भारताला निमंत्रण

रशियाने 20 ऑक्टोबर रोजी मॉस्कोमध्ये याचप्रकारची बैठक आयोजित केलीये. या बैठकीसाठी भारतासोबतच तालिबानला देखील निमंत्रण आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबतची माहिती देताना म्हटलंय की, भारताला अफगाणिस्तानवरील मॉस्को फोमेर्टच्या बैठकीचं निमंत्रण मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Women Joint Pain: महिलांना सतावतेय हिवाळ्यातील सांधेदुखी; योग्‍य तपासण्‍या, जीवनशैलीविषयक बदल करण्‍याचा तज्ज्ञांचा सल्‍ला

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रवासबंदीचा बडगा; आणखी वीस देशांच्या अमेरिकावारीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT